पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची आज भेट होण्याची शक्यता आहे. तीन दिवसाच्या वाराणसी दौऱ्यावर असेलेले मोहन भागवत रविवारी पोहचले. भविष्यातील संघटनाच्या कार्यक्रमाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकारिणीला भागवत संबोधित करणार आहेत. योगायोगाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदीही वाराणसी दौऱ्यावर आहेत. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये भेट होण्याची शक्यता आहे. मात्र, संघातील एका वरिष्ठ नेता आणि सरकारमधील सुत्रांच्या माहितीप्रमाणे मोहन भागवत आणि मोदी यांच्या भेटण्याचा कोणताही पुर्वनियोजित कार्यक्रम नाही.

मोहन भागवत यांच्यासोबत आज होणाऱ्या बैठकीत संघाच्या सहा विभागातील वरिष्ठ कार्यकर्ता भाग घेणार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सरसंघटालकाची ही महत्वाची बैठक आहे. यामध्ये संघाची पुढील दिशा काय असणार यावर मंथन केले जाणार असल्याचे संघाच्या एका आधिकाऱ्याने सांगितले.

मोहन भागवत यांच्या आजच्या बैठकीमध्ये राम मंदिरावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील महिन्यापासून संघातर्फे राम मंदिरासाठी हुंकार रॅलीचे आयोजन केले जाणार असून पहिली हुंकार रॅली संघाच्या भूमीत म्हणजेच नागपूरमध्ये २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यावर आजच्या बैठकीत मंथन होणार आहे.

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये तीन हजार कोटींच्या विकासकामचे उद्धाटन करणार आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार आज मोदी आणि भागवत यांची भेट होण्याची शक्यता आहे.