करोना संकटाचा सामना करत असताना सध्या देशात ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर करोनाविरोधातील लढ्यात मैदानात उतरला आहे. सचिनने मिशन ऑक्सिजनसाठी तब्बल एक कोटी रुपयांची मदत केली आहे.

सचिन तेंडूलकरने मिशन ऑक्सिजन या मोहिमेसाठी 1 कोटी रुपयांची मदत केली आहे. 250 उद्योजक तरूणांनी सुरू केलेल्या या मोहिमेत सचिनने सहभाग घेतला आहे. यापूर्वी गेल्या वर्षीही सचिनने अशीच मदत केली होती. तेव्हा त्याने पंतप्रधान सहाय्यता निधी आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी 25 लाख रुपयांचा निधी दिला होता. मिशन ऑक्सिजन मोहिमेसाठी एक कोटी रुपयांची मदत करत असल्याची माहिती सचिनने ट्विटरद्वारे दिली. तसेच, “मी खेळत असतााना तुमच्याकडून मिळालेला पाठिंबा अमूल्य होता, त्यामुळे मी यश मिळवू शकलो…आज आपण करोनाविरोधात लढणाऱ्यांच्या मागे ठामपणे उभं राहण्याची आणि त्यांना पाठिंबा देण्याची वेळ आहे”, अशा आशयाचा संदेशही यावेळी त्याने दिला आहे.

Teacher
२४ हजार शिक्षकांची भरती रद्द, मिळालेला पगारही चार आठवड्यांत परत करण्याचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?
ms dhoni thala joined hands being thankful to fan in ekana cricket stadium lsg vs csk ipl 2024 live match
थालाच्या भरमैदानातील ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मने; VIDEO पाहून म्हणाले, “वॉव…”
Virat Kohli's video goes viral
IPL 2024: गौतम गंभीरच्या गळाभेटीवर विराटने सोडले मौन; चाहत्यांना म्हणाला, ‘तुमचा मसाला संपला म्हणून तुम्ही…’, पाहा VIDEO
Recruitment for posts of Police Constables refusal to grant interim stay to order of extra marks to transgender
पोलीस हवालदार पदांसाठी भरती, तृतीयपंथीयांना अतिरिक्त गुण देण्याच्या आदेशाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार

दरम्यान, काही दिवसांपूर्वी रोड सेफ्टी क्रिकेट सीरिजमध्ये सहभागी झाल्यानंतर सचिनलाही करोनाची लागण झाली होती. ही स्पर्धा संपवून घरी आल्यावर सचिनला करोना झाल्याचं स्पष्ट झालं. नंतर करोनामधून सावरल्यावर अलिकडेच त्याने प्लाझ्मादेखील दान करण्याचे आवाहन केले होते. एक व्हिडिओ शेअर करुन मी प्लाझ्मा दान करणार असून तुम्हीही प्लाझ्मा दान करायला हवे असे आवाहन केले होते. दरम्यान, सचिन तेंडुलकरशिवाय इतर काही भारतीय आणि आयपीएलमध्ये खेळणाऱ्या काही परदेशी खेळाडूंनीही करोनाविरोधातील लढ्यात मदत केली आहे.