News Flash

धक्कादायक, SFJ कडून भारतीय लष्करातील शीख सैनिकांना बंडासाठी चिथावणी देण्याचा प्रयत्न

काश्मीरला भारतापासून वेगळं करण्याचं SFJ जे उघडपणे समर्थन करतं.

अमेरिका स्थित शीख फॉर जस्टिस या फुटीरतावादी संघटनेने खलिस्तानच्या उद्दिष्टासाठी एका धोकादायक कारस्थान रचल्याचं समोर आलं आहे. भारतीय लष्करातील शीख सैनिकांना भारताविरोधात बंड करण्यासाठी चिथावणी देण्याचा कट त्यांची रचला होता. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) दाखल केलेल्या आरोपपत्रात हे म्हटलं आहे.

आरोपपत्रामध्ये १६ आरोपींची नाव आहेत. यात SFJ चा नेता गुरपतवंत सिंग पन्नून खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख हरदीप सिंग निज्जर आणि बब्बर खालसा इंटरनॅशनलचा प्रमुख परमजीत सिंग यांची नावे आहेत. काश्मिरी युवकांना कट्टरपंथाकडे नेणं तसंच काश्मीरला भारतापासून वेगळं करण्याचं SFJ जे उघडपणे समर्थन करतं, असं आरोपपत्रात म्हटलं आहे.

गुरपतवंत सिंग पन्नू न्यू यॉर्कचा, निज्जर कॅनडाचा तर परमजीत यूकेचा रहिवाशी आहे. जुलै महिन्यात यूएपीए अंतर्गत या चौघांचा दहशतवाद्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. यूएपीए अंतर्गत शीख फॉर जस्टिसवर बंदी असून ही संघटना खलिस्तानी दहशतवादी संघटनांचा चेहरा आहे तसेच पाकिस्तानशी संबंधित आहे, असे एनआयएने म्हटले आहे. फेसबुक, टि्वटर, व्हॉट्स अ‍ॅप या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करुन, SFJ स्वतंत्र खलिस्तानच्या उद्दिष्टासाठी शांतता-सौहार्द बिघडवणे, अस्थिरता वाढवण्याचे काम करते असे एनआयएमधील सूत्रांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2020 1:42 pm

Web Title: sfj trying to instigate sikhs in army nia dmp 82
Next Stories
1 पोटाला चिमटा बसल्यावरच शेतकरी रागानं रस्त्यावर येतो : अजित पवार
2 तुम्ही मत देता म्हणजे नेत्यांना विकत घेत नाही; साध्वी प्रज्ञा ठाकूर व्यापाऱ्यांवर संतापल्या
3 ९७१ कोटींच्या नवीन संसद भवनाचा पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा
Just Now!
X