राज्यसभेच्या उपसभापती हरिवंश यांची निवड झाली आहे. हरिवंश हे एनडीएचे उमेदवार होते. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांतर्फे या निवडीसाठी बी. के. हरिप्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांचा पराभव झाला. याबाबत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना विचारले असता राजकारणात हार-जीत चालतच असते. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. एवढे एक वाक्य बोलून त्या निघून गेल्या. त्यांना राज्यसभेच्या उपसभापतीपदी हरिप्रसाद यांची निवड होईल असे वाटले असावे. मात्र ते शक्य झाले नाही त्यामुळे त्यांनी राजकारणात हार-जीत तर चालतच असते अशी प्रतिक्रिया दिली आणि तिथून निघून जाणे पसंत केले.

हरिवंश यांची निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले. हरिवंश हे राजकारणात येण्याआधी पत्रकार होते. संपादक आणि लेखकही होते. त्यांच्या अनुभवाचा फायदा आपल्या सगळ्यांना होईल. आता सगळ्याच खासदारांवर हरीकृपा राहिल असेही मोदी यांनी म्हटले आहे. तसेच अरूण जेटली यांनीही त्यांचे कौतुक करत अभिनंदन केले. सोनिया गांधी यांनी मात्र राजकारणात हारजीत होतच असते असे म्हटले आहे.