20 September 2020

News Flash

जिओ, व्हॉट्स अॅपवर ‘भारी’ पडणार BSNL ? देशातील पहिली ‘इंटरनेट टेलीफोनी’ सेवा सुरु

यापूर्वी, जर समोरच्या व्यक्तीकडे तुम्ही वापरत असलेलं अॅप असेल तरंच अॅपद्वारे फोन कॉल करणं शक्य व्हायचं.

सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएलने देशात पहिल्यांदाच इंटरनेट टेलीफोनी सेवेची सुरूवात केली आहे. या सेवेअंतर्गत बीएसएनएलचे ग्राहक मोबाइल अॅपद्वारे देशभरात कोणत्याही फोन क्रमांकावर कॉल करु शकतात. यासाठी बीएसएनएल ग्राहकांनी केवळ मोबाइल अॅप Wings डाउनलोड करण्याची गरज आहे. दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी ही सेवा आज लॉन्च केली.

यापूर्वी, जर समोरच्या व्यक्तीकडे तुम्ही वापरत असलेलं अॅप असेल तरंच अॅपद्वारे फोन कॉल करणं शक्य व्हायचं. पण बीएसएनएलच्या Wings अॅपद्वारे देशातील कोणत्याही फोन नंबरवर कॉल करता येणार आहे. याद्वारे कॉल करण्यासाठी सिमकार्डची गरज लागत नाही. या आठवड्यापासूनच या सेवेसाठी नोंदणी सुरू होत असून २५ जुलैपासून ही सेवा सुरू होईल.

Wings अॅपद्वारे बीएसएनएलचे ग्राहक देशातील कोणत्याही नेटवर्कच्या क्रमांकावर बीएसएनएल वाय-फाय किंवा अन्य कोणत्याही सर्विस प्रोवायडरद्वारे कॉल करु शकतात. अॅपद्वारे कॉलिंगला यापूर्वीच मान्यता मिळालेली आहे. मात्र, बीएसएनएलची ही सेवा मोफत नसेल, सामान्य कॉलचे नियम याला लागू असतील. कारण, ज्या टेलिकॉम कंपन्या इंटरनेट टेलीफोनी सेवा पुरवतात त्यांनी कॉल इंटरसेप्शन आणि मॉनिटरिंगचीही व्यवस्था करावी, असे स्पष्ट निर्देश टेलिकॉम आयोगाने दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2018 3:32 pm

Web Title: state run telecom firm bsnl today unveiled first internet telephony service wings
Next Stories
1 वडील मृत्यूशय्येवर असताना ‘तो’ वाचवत होता थायलंडमधल्या मुलांना
2 माऊंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले भारतीय बाप-लेक
3 मक्याची रोटी व सरसोंका साग ही पंजाबची जगाला भेट: नरेंद्र मोदी
Just Now!
X