04 June 2020

News Flash

कन्हैय्या कुमारच्या जामीन अर्जावर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार

पतियाळा कोर्टान वकिलांच्या मारहाणीनंतर कन्हैय्याने जामिनासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

Kanhaiya Kumar: कन्हैय्याच्या याचिकेवर सुनावणी देण्यास सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे नकार दिला.

देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेला जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील(जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्या कुमार याच्या जामीन अर्जावरील सुनावणीस सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. कन्हैय्याने जामिनासाठी उच्च न्यायालयात जावं, असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत.

कन्हैय्या बिहारचा सुपूत्र; त्याने कोणतेही देशविरोधी वक्तव्य केले नाही- शत्रुघ्न सिन्हा

पतियाळा कोर्टान वकिलांच्या मारहाणीनंतर कन्हैय्याने जामिनासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. खालच्या न्यायालयात न्याय मिळण्याची अपेक्षा नसून जीवाला धोका असल्याचे कन्हैय्याने आपल्या याचिकेत नमूद केले होते. मात्र, कन्हैय्याच्या याचिकेवर सुनावणी देण्यास सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे नकार दिला. हाय कोर्ट हे प्रकरण हाताळू शकत नाही, असं म्हणणं चुकीचं आहे. अर्जकर्त्यांनी आधी तेथे दाद मागावी. जामिनासाठी थेट सुप्रीम कोर्टात येण्याची वेळ अद्याप आलेली नाही, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने कन्हैय्या आणि त्याच्या वकिलांच्या सुरक्षेचे आदेश सरकारला यावेळी दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2016 12:34 pm

Web Title: supreme court refuses to hear kanhaiya kumar bail plea
Next Stories
1 अर्थसंकल्प.. समजुनि घ्यावा सहज..
2 अरुणाचल प्रदेशात सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा
3 वकिलांच्या धुडगूस प्रकरणी अहवाल सादर
Just Now!
X