News Flash

राजकारणातलं एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व हरपलं-राज ठाकरे

विचारधारा वेगळ्या असूनही प्रत्येकाशी जुळवून घेण्याची सुषमा स्वराज यांची वृत्ती कायम लक्षात राहिल असंही राज यांनी म्हटलं आहे

सुषमा स्वराज म्हणजे भारतीय राजकारणातील एक सुसंस्कृत आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व होत्या. विचारधारा वेगळ्या असतील तरीही प्रत्येकाशी जुळवून घेण्याची त्यांची वृत्ती कायम लक्षात राहिल असं म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सुषमा स्वराज यांना आदरांजली वाहिली आहे. माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचं ‘कार्डिअ‍ॅक अरेस्ट’मुळे निधन झालं.

सुषमा स्वराज यांच्या निधनाची बातमी समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सगळ्याच नेत्यांनी ट्विटर, सोशल मीडियावरुन सुषमा स्वराज यांना आदरांजली वाहिली. तसेच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शोक व्यक्त केला आहे. आता राज ठाकरे यांनीही सुसंस्कृत आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व हरपल्याबाबत शोक व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2019 11:55 am

Web Title: sushma swaraj a cultured graceful and an efficient leader says raj thackeray scj 81
Next Stories
1 Article 370: कैलास मानसरोवर यात्रेकरुंना चीनने नाकारला व्हिसा
2 स्वराज यांच्या प्रयत्नांमुळे पाकमधून भारतात परतलेला तरुण म्हणतो…
3 “आम्हालाही भारतामध्ये घ्या”; पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेची मागणी
Just Now!
X