बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत स्वबळावर उतरलेल्या लोक जनशक्ती पार्टीला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागेलं आहे. केवळ एकाच जागेवर लोजपाचा उमेदवार विजयी झाला आहे. या निकालावर प्रतिक्रिया देताना लोजपाचे प्रमुख चिराग पासवान यांनी म्हटले की, “२५ लाख लोकांची मतं मिळाली आहेत. याप्रकारे बिहारच्या जनतेने आम्हाला त्यांचे प्रेम दिले आहे. आम्ही राज्यात नितीश कुमार यांना पाठिंबा देणार नाही, मात्र केंद्रात पंतप्रधान मोदींना समर्थन कायम ठेवणार आहोत.”

चिराग पासवान यांनी हे देखील सांगितले की, बिहारच्या जनतेकडून देण्यात आलेल्या प्रेमामुळे आनंदी आहे. जवळपास २५ लाख मतदारांनी ‘बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट’ वर विश्वास ठेवला आणि एकट्याने निवडणूक लढत आम्ही सहा टक्के मतं मिळवली. आम्हाला ‘पिछलग्गू पार्टी’ म्हटले जात होते, जी केवळ इतरांच्या पाठबळावर काही करू शकत होती. मात्र आम्ही धैर्य दाखवले आहे.

आणखी वाचा- “भाजपा-संघाला सोडा आणि…”; नितीश कुमार यांना काँग्रेसकडून ऑफर

आणखी वाचा- नितीश कुमार मुख्यमंत्री होणार का? फडणवीसांनी शिवसेनेवर निशाणा साधत दिलं उत्तर; म्हणाले…

नितीश कुमार व सुशील मोदींना माझे कधीच समर्थन नसणार. जर ते माझ्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कायम राहिले तर, राज्यस्तरावर माझे समर्थन नसेल. आम्ही केंद्रात पंतप्रधान मोदींना समर्थन कायम ठेवणार आहोत. असं यावेळी चिराग पासवान यांनी स्पष्ट केलं.

लोक जनशक्ती पार्टी या जागेवर विजयी झाली –
बेगुसराय येथील मटिहानी मतदारसंघात विजय मिळाला आहे. ज्या ठिकाणी लोजपाचे उमेदवार राजकुमार सिंह यांनी जदयूच्या बोगा सिंह यांचा पराभव केला.