03 August 2020

News Flash

झारखंडमध्ये बालिकेवर बलात्कार करून शिरच्छेद

या मुलीचे शिर अद्यापही मिळाले नसून पोलीस त्याबाबत कसून शोध घेत आहेत.

| August 2, 2019 12:01 am

संग्रहित छायाचित्र

जमशेदपूर (झारखंड) : टाटानगरमध्ये दोन नराधमांनी एका तीन वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिचा शिरच्छेद करण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या मुलीचे शिर अद्यापही मिळाले नसून पोलीस त्याबाबत कसून शोध घेत आहेत.या बालिकेचे धड एका प्लास्टिक पिशवीमध्ये कोंबून ती पिशवी झुडपामध्ये टाकून देण्यात आली होती. मंगळवारी रात्री हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नराधमांचा शोध घेण्यासाठी श्वानपथकाची मदत घेण्यात येत आहे. ही मुलगी आपल्या पालकांसोबत झोपलेली असताना तिचे शुक्रवारी रात्री रेल्वे स्थानकातून अपहरण करण्यात आले होते. या बलात्कार आणि हत्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.  यापैकी दोघांनी गुन्ह्याची दिल्याचे पोलीस अधीक्षक एहतेशाम वकारिब यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2019 12:01 am

Web Title: three year old girl raped beheaded in jharkhand zws 70
Next Stories
1 अमित शाह, हिंमत असेल तर नथुरामला दहशतवादी म्हणा-कपिल सिब्बल
2 ट्रिपल तलाक कायदा मान्य नसल्याचे टीएमसीच्या मंत्र्याचे विधान
3 लक्स कोझी अंडरवेअर हा भारतीय गुप्तहेर असल्याचा पुरावा : पाकचा हास्यास्पद दावा
Just Now!
X