23 September 2020

News Flash

Mitron अ‍ॅप आमच्याकडून केवळ अडीच हजारांना घेतलं विकत; पाकिस्तानी कंपनीचा दावा

TikTok ला पर्याय म्हणून लोकप्रिय होत असलेले

TikToks rival Mitron app

युट्यूब विरुद्ध टिक-टॉक आणि त्यांनतर टिक-टॉकवरील वादग्रस्त व्हिडिओंची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सोशल मिडियावर आहे. टिक-टॉकला या सर्वाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळेच चीनी बनवटीच्या टिक-टॉकला टक्कर देणाऱ्या मित्रो (Mitron) या अ‍ॅपकडे अनेकजण वळल्याचे चित्र दिसत आहे. मागील काही दिवसांपासून लाखोच्या संख्येने या अ‍ॅपला डाऊनलोड करण्यात आलं आहे. टिक-टॉकप्रमाणेच छोटे मजेदार व्हिडिओ बनवता येणारे हे अ‍ॅप सध्या चांगलेच चर्चेत आहेत. मात्र असं असलं तरी आता या अ‍ॅपबद्दल ‘नेटवर्क १८’ने एक धक्कादायक खुलासा केला आहे. चीनच्या टिक-टॉकला टक्कर देण्यासाठी बाजारात आलेले मित्रो हे अ‍ॅप चक्क पाकिस्तानी कंपनीचे असल्याचा दावा एका पाकिस्तानी सॉफ्टवेअर कंपनीने केला आहे.

भारतीय बनावटीची आणि स्थानिक पातळीवर म्हणजे ‘व्होकल फॉर लोकल’च्या आवहानानंतर टिक-टॉकऐवजी लाखो लोकांनी मित्रो अ‍ॅपला पसंती दिल्याचे पहायला मिळत आहे. हे अ‍ॅप भारतामधील आयआयटीच्या विदर्थ्यांनी बनवलं असून टिक-टॉकऐवजी हे अ‍ॅप वापरा असा प्रचार सोशल नेटवर्किंगवर केला जात आहे. मात्र हे अ‍ॅपची मालकी पाकिस्तानी कंपनीची असल्याचे समजते. या अ‍ॅपचे सर्व फिचर्स, इंटरफेस आणि इतर गोष्टी या पाकिस्तानमधील सॉफ्टवेअर डेव्हलपर कंपनी असणाऱ्या क्यूबॉक्सअसचे (Qboxus) आहेत.

क्यूबॉक्सअसचा संस्थापक इरफान शेख याने दिलेल्या माहितीनुसार कंपनीने या अ‍ॅपचा सोर्सकोड (ज्यावर अ‍ॅपचे पूर्ण काम अवलंबून असतं) दोन हजार ६०० रुपयांना (३४ डॉलरला) विकत घेतलं आहे. आम्ही दिलेल्या कोडच्या आधारे संपूर्ण प्रोडक्ट निर्माण केला जाईल असं आम्हाला वाटलं होतं मात्र हा सोर्सकोड विकत घेणाऱ्या मित्रोच्या सध्याच्या टीमने आमचाच संपूर्ण कोड वापरला मात्र लोगो आणि नाव बदलून तो त्यांच्या स्टोअर्सवर अपलोड केला, असं क्यूबॉक्सअसने म्हटलं आहे.

५० लाखांहून अधिक जणांनी डाऊनलोड केलेले हे टिक-टॉक प्रमाणेच काम करणारे हे अ‍ॅप हे रूरकी येथील ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या (आयआयटी) विद्यार्थ्यांनी बनवल्याचे सांगण्यात येत होते. मात्र यामागील सत्य वेगळचं असल्याची माहिती आता या अ‍ॅपचा सोर्सकोड बनवून तो भारतीय डेव्हपर्सला विकणाऱ्या क्यूबॉक्सअसने केला आहे.

मैत्रोमध्ये प्रायव्हसी पॉलिसीबरोबरच इतर गोष्टींबद्दलही शंका घेण्यास वाव आहे. खरं तर या अ‍ॅपचे प्रमोटर त्यांची ओळख सांगू नयेत म्हणून ‘शॉपकिलर’ असे टोपणनाव वापरतात. प्लेस्टोरवरही या अ‍ॅपच्या गोपनियता धोरणांबद्ल स्पष्टपणे काहीच सांगण्यात आलेलं नाही. हे अ‍ॅप मूळचे पाकिस्तानी असल्याची बातमी समोर आल्यानंतर शॉपकिलरने इमेलवरुन या लेखासंदर्भात नाराजी व्यक्त केल्याचेही नेटवर्क १८ ने म्हटलं आहे. “आम्हाला हा लेख निराशाजनक वाटला. आम्ही अ‍ॅपवर खूप मेहनत घेत आहोत. त्याची तुम्ही दखल घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे. हे अ‍ॅप निर्माण करण्यामागे भारतीयांना एक स्वदेशी बनवावटीचा पर्याय उपलब्ध करुन देणे हाच आहे,” असं दावा शॉपकिलरने केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2020 9:35 am

Web Title: tiktoks rival mitron app not made in india bought for rs 2500 from pakistani company report scsg 91
Next Stories
1 “अपरिमित यातना सोसल्या”, मोदींनी देशवासियांना संबोधून लिहिलेल्या पत्रात स्थलांतरितांचा उल्लेख
2 करोनावरुन गुजरात सरकारवर ताशेरे ओढणाऱ्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठात मोठा फेरफार
3 अमेरिकेने WHO सोबतचे तोडले सर्व संबंध; चीनच्या हातची बाहुली असल्याचा ट्रम्प यांचा आरोप
Just Now!
X