हरियाणामध्ये आज केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई दिल्ली एक्सप्रेस-वेची पहाणी केली. या ठिकाणी एका कार्यक्रमासाठी गडकरी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी गुरुग्राममधील सोहना येथे जाऊन मुंबई दिल्ली एक्सप्रेस-वेच्या बांधकाम कुठपर्यंत पोहचलं आहे. कामात किती प्रगती झालीय याची पहाणी केली. या प्रवासासाठी सध्या १४५० किमी अंतर कापावं लागतं पण एक्सप्रेस-वे झाल्यानंतर हे अंतर १२५० किमी होणार आहे. त्यामुळे सध्या २४ तासांचा वेळ लागणारा हा प्रवास एक्सप्रेस वेमुळे १२ तासांवर येईल असं सांगितलं जातं आहे. गडकरींनीही या प्रकल्पाला उल्लेख करताना जगातील सर्वात मोठा एक्सप्रेस-वे असं म्हटलं आहे.

हरियाणामध्ये दिल्ली कटरा एक्सप्रेस-वेबद्दलही गडकरींनी भाष्य केलं आहे. पुढील दोन वर्षांमध्ये हा एक्सप्रेस-वे वापरण्यासाठी उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त करताना या मार्गामुळे दोन शहरांमधील अंतर ७२७ किलोमीटरवरुन थेट ५७२ किलोमीटरवर येईल असं गडकरी म्हणाले आहेत. या मार्गामुळे दोन शहरांमधील प्रवास हा केवळ सहा तासांवर येणार असल्याचंही ते म्हणालेत.

Tata Punch Car sale
टाटाच्या ‘या’ सर्वात स्वस्त SUV नं Wagon R, Dzire चं वर्चस्व संपवलं? झाली दणक्यात विक्री, मायलेज २६ किमी
iral Video Shows Woman Police Officer Dancing On Railway Station
रेल्वे स्टेशनवर पोलिसांच्या गणवेशात नाचणाऱ्या तरुणीचा Video Viral! नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Loksatta viva Services and travel Volunteer Tourism Tourism
सफरनामा: सेवा आणि प्रवास!
SECR Recruitment 2024 jobs at railway
SECR Recruitment 2024 : रेल्वेमध्ये ‘या’ पदांसाठी मोठ्या संख्येने होणार भरती! अधिक माहिती पाहा

यावेळी गडकरींनी दिल्ली-चंढीगड, दिल्ली-डेहरादून, दिल्ली-हरिद्वार यासारखे मार्ग बांधण्यासाठी आम्ही काम करत असून हे मार्ग झाल्यास या ठिकाणांवर दोन तासांमध्ये पोहचता येईल असंही गडकरी म्हणालेत.

हरयाणा सरकार सध्या बांधत असणारे हायवे हे दिल्लीसाठी फार महत्वाचे असून या महामार्गांमुळे पंजाब, राजस्थान, उत्तराखंडसारख्या राज्यांकडे जाणाऱ्या वाहतुकीचं विभाजन होऊन वाहतूक गतीवान होईलच शिवाय दिल्लीमधील प्रदुषणाचा प्रश्नही सोडवण्यास मदत होईल, असंही गडकरी म्हणालेत.

यावेळी बोलताना गडकरींनी जगातील सर्वात मोठा एक्सप्रेस-वे भारतामध्ये उभारला जात असून त्याचा संपूर्ण देशाला अभिमान आहे असं दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वेसंदर्भात बोलताना म्हटलं आहे. या एक्सप्रेस-वेमुळे दिल्लीहून अवघ्या साडेबारा तासांमध्ये मुंबईला पोहचता येईल असंही गडकरींनी सांगितलं.

गडकरी यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासोबत जाऊन दिल्ली मुंबई एक्सप्रेस-वेच्या कामाची पहाणीसुद्धा केली. यावेळी गडकरी हे या ठिकाणी हेलिकॉप्टरने पोहचले.

यावेळी गडकरींनी २०२३-२४ पर्यंत आम्ही अडीच हजार किलोमीटरचे रस्ते राजस्थानमध्ये उभारणार असल्याचं गडकरींनी राजस्थानमधील अन्य एका कार्यक्रमामध्ये सांगितलं. या प्रकल्पांचा खर्च ३० हजार कोटी रुपये इतका असणार आहे.

२०१८ रोजी गडकरींनी पहिल्यांना मुंबई- दिल्ली एक्सप्रेस-वेची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी चंबळ एक्सप्रेस वे तयार करुन तो मुंबई-दिल्ली एक्सप्रेस वेला जोडणार असल्याचंही सांगितलं होतं. या एक्सप्रेस-वेमुळे मध्यप्रदेश, राजस्थान राज्यातील अनेक दुर्गम किंवा आदिवासी भाग जोडले जातील, त्यामुळे या भागांचा मोठा विकास होईल असंही गडकरी म्हणाले होते. नवीन दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे हा ग्रीनफील्ड मार्ग असेल आणि तुलनेने कमी विकसित असलेल्या प्रदेशातून जाईल, अशी माहिती गडकरी यांनी दिली होती.