पाकिस्तानातील बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उद्धवस्त केल्याच्या कारवाईचे पुरावे आपल्याकडे असल्याचे लष्कराने स्पष्ट केले आहे. मात्र, हे पुरावे जनतेसमोर कधी सादर करायचे हे सरकारचे काम आहे, असे एअर व्हाईस मार्शल आरजीके कपूर यांनी सांगितले. नवी दिल्लीत तिन्ही दलांची संयुक्त पत्रकार परिषद गुरुवारी पार पडली यावेळी ते बोलत होते.
Air Vice Marshal RGK Kapoor: We have evidence to show that whatever we wanted to do and targets we wanted to destroy, we have done that. Decision to show the evidence is on senior leadership pic.twitter.com/RxwZKJOZaG
— ANI (@ANI) February 28, 2019
एअर व्हाईस मार्शल कपूर म्हणाले, पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये आपण जाणीवपूर्वक लष्करी कारवाई केली नव्हती तर केवळ तेथील ‘जैश’च्या दहशतवादी तळांना टार्गेट केले होते. आम्हला जे करायचे होते ते आम्ही केले. या कारवाईद्वारे दहशतवाद्यांचे तळ आम्ही उद्धवस्त केले. मात्र, पाकिस्तानने आपल्या हद्दीत घुसून आपल्या लष्करी तळांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानच्या या विमानांनी आपल्या लष्करी तळांना टार्गेट केले होते. मात्र, ते आपले नुकसान करु शकले नाहीत.
पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना कपूर म्हणाले, बालाकोटच्या कारवाईचे पुरावे आमच्याजवळ आहेत. हे पुरावे उघड करायचे काम आपल्या सरकारचे आहे. त्यामुळे ते कधी द्यायचे किंवा द्यायचे नाहीत हे सरकार ठरवेल.