04 March 2021

News Flash

मोठी बातमी! करोनाबाधिताच्या संपर्कात आल्याने WHO प्रमुख होम क्वारंटाइन

पुढील काही दिवस घरूनच काम करणार असल्याचे सांगितले.

संग्रहित

जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूच्या संसर्गाच्या विळख्यात अगदी सर्वसामान्यांपासून ते व्हीव्हीआयपी मंडळी देखील सापडल्याचे दिसून आले आहे. अद्यापही करोनाचा संसर्ग जगभरात सुरूच आहे. आता, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांना देखील याचा फटका बसल्याचे दिसत आहे. कारण, करोनाबाधित व्यक्तीच्या ते संपर्कात आल्याने त्यांनी आता होम क्वारंटाइन झाले आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्विटद्वार माहिती दिली आहे.

मागील काही दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आल्याने, टेड्रोस यांनी होम क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे.

”मी करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे दिसून आले आहे. सध्या मी पूर्णपणे स्वस्थ आहे व माझ्या कोणतीही लक्षणं नाहीत. परंतु, जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांप्रमाणे मी पुढील काही दिवसांसाठी होम क्वारंटाइनमध्ये असणार आहे व घरूनच काम करणार आहे.”

आपण सर्वांनी आरोग्य विषयक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. असे केले तरच आपण करोना संसर्गाची साखळी तोडू शकू व करोनावर मात करू शकणार आहोत. तसेच, यामुळे आरोग्य प्रणालीचे रक्षणही करू शकणार आहोत. असंही टेड्रोस यांनी म्हटलं आहे.

करोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत करोनाबाधितांच्या संख्येत मोठ्याप्रमाणावर वाढ झाल्याने युरोपीतील देशांमध्ये पुन्हा एकदा लॉकाडाउन जाहीर करण्यात आलेला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2020 8:32 am

Web Title: who chief tedros adhanom ghebreyesus home quarantine msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मोदी सरकारने जाहिरातींसाठी रोज खर्च केले दोन कोटी रुपये; RTI मधून समोर आली माहिती
2 गिलगिट-बाल्टीस्तान आमचा अविभाज्य घटक; भारताने पाकिस्तानला खडसावले
3 ‘हिज्बूल’प्रमुख सैफुल्ला ठार
Just Now!
X