03 December 2020

News Flash

धक्कादायक! पतीच्या मृतदेहाशेजारी ती चार दिवस बसून होती

चार दिवसांनंतर शेजाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आला

प्रातिनिधिक छायाचित्र

कोलकातामध्ये काळीज पिळवटून काढणारी घटना घडली आहे. पतीचं निधन झाल्यानंतर त्याच्या मृतदेहाशेजारी ७० वर्षीय महिला ४ दिवस बसून होती. मृतदेहातून दुर्घंधी येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांच्या हा संपूर्ण प्रकार लक्षात आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे.

दक्षिण कोलकातामधील हरिदेवपुर येथे ही घटना घडली आहे. या परिसरात राहणाऱ्या अमर सान्याल या ८२ वर्षीय वृद्धाचा चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. पण, त्यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या पत्नी हसीरानी देवी यांनी शेजाऱ्या पाजाऱ्यांना न देता त्या मृतदेहाशेजारी चार दिवस बसून होत्या. त्याच्या घरातून असह्य दुर्घंधी येत असल्यानं शेजाऱ्यांनी त्यांचं दार उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा हा धक्कादायक प्रकार त्यांच्या नजरेस आला. हसीरानी देवी यांची मानसिक स्थिती ठिक नव्हती, तसेच आपल्या पतीचा मृत्यू झाल्याचं त्यांना कळलं नसल्यानं त्या मृतदेहाशेजारी ४ दिवस बसून असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

घटनास्थळी पोलीस पोहोचल्यानंतरही हसीरानी देवी मानिसिक धक्क्यातून सावरल्या नव्हत्या. ८ जानेवारीपासून या वृद्ध दाम्पत्यांच्या घरात नातेवाईक किंवा शेजारी पाजारी फिरकले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2018 5:33 pm

Web Title: wife stayed with her husband dead body for four days in kolkata
Next Stories
1 बसमध्ये त्याचा मृत्यू झाला, कंडक्टरने मृतदेहमध्येच खाली उतरवला
2 ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार सगळ्या आघाड्यांवर अपयशी’
3 अभिनेत्री चारु रोहतगी यांचे हृदविकाराच्या झटक्याने निधन
Just Now!
X