03 March 2021

News Flash

VIDEO – विकृती ! धावत्या ट्रेनमध्ये महिलेच्या शरीराला करत होता चोरटा स्पर्श

प्रवासामध्ये गर्दीचा फायदा घेऊन काही विकृत महिलांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करतात.

(प्रातिनिधीक छायाचित्र)

प्रवासामध्ये गर्दीचा फायदा घेऊन काही विकृत महिलांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करतात. दिल्ली-सहारनपूर एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेला अशाच धक्कादायक अनुभवातून जावे लागले. या वयोवुद्ध व्यक्तिला आपल्या वयाचेही भान राहिले नाही. त्याच्या या अश्लील कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पीडित महिला दिल्ली-सहारनपूर एक्सप्रेसमधून प्रवास करताना एक वयोवुद्ध माणूस तिच्या शेजारी येऊन बसला.

ती महिला झोपेत असताना या माणसाने तिच्या पायावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला या महिलेने त्याकडे दुर्लक्ष केले. पण नंतर आरोपीची हिम्मत वाढली. तो वारंवार तिच्या पायाला स्पर्श करु लागला. त्याचा वाईट हेतू लक्षात येताच महिलेने त्याला जाब विचारला.या महिलेने त्या वयोवुद्धाची कानउघडणी केली व त्याला आसन सोडण्यास सांगितले. पण त्या व्यक्तिने उलटा वाद घातला. अखेर सहप्रवाशांनी खडसावल्यानंतर त्याने आपली जागा सोडली.

देशाच्या वेगवेगळया भागात गर्दीच्या ठिकाणी काही वेळा महिलांना अशा अनुभवातून जावे लागते. ट्रेनमध्ये महिलांच्याबाबतीत घडणाऱ्या गुन्ह्यांविरोधात ठोस कारवाई होत नसल्यामुळे असे गुन्हे करणाऱ्यांची हिम्मत वाढत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2018 7:06 pm

Web Title: women molested in running train by older man
टॅग : Molestation
Next Stories
1 समाजवादी पक्षाला हादरा, नरेश अग्रवाल भाजपात
2 पाच हजार कोटींचा घोटाळा, ईडीकडून आरोपपत्र दाखल होताच आंध्रा बँकेचे शेअर्स कोसळले
3 FB Live बुलेटीन: शेतकरी मोर्चा, काठमांडूत विमान कोसळले व अन्य बातम्या
Just Now!
X