कर्करोग, मधुमेह, रक्तदाबासह ५६ औषधांच्या किमतींवर सरकारचे नियंत्रण

कर्करोग, मधुमेह, जिवाणूंचा संसर्ग आणि रक्तदाब यांसारख्या विकारांवर उपचार म्हणून वापरण्यात येणाऱ्या ५६ महत्त्वाच्या औषधांच्या किमतींवर सरकारने नियंत्रण आणले असून त्या सरासरी २५ टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत.

तथापि, राष्ट्रीय औषधे किंमत प्राधिकरण (एनपीपीए) या औषध दर नियामकाने ग्लुकोज आणि सोडियम क्लोराइड यासारख्यांच्या इंजेक्शनच्या छोटय़ा पाकिटांच्या दरांमध्ये वाढ केली आहे.  औषधांच्या किमती सरासरी २५ टक्के कमी करण्यात आल्या आहेत, मात्र काही औषधांच्या किमती १० ते १५ टक्के कमी करण्यात आल्या आहेत. याखेरीज काही दर तर तब्बल  ४५ ते ५० टक्क्यांनी कमी झाले असल्याचे एनपीपीएचे अध्यक्ष भूपेंद्रसिंह यांनी सांगितले. एपीपीएने ग्लुकोज, सोडियम क्राइड यासारख्या इंजेक्शनच्या छोटय़ा पाकिटांच्या दरात वाढ केली आहे तर मोठय़ा पाकिटांच्या दरात कपात केली आहे. जे उत्पादक मर्यादेचे पालन करणार नाहीत त्यांच्याकडून जादा आकारण्यात येणाऱ्या दरावर व्याजासह अनामत घेण्यात येईल, असा इशारा एपीपीएने अधिसूचनेत स्पष्ट केले आहे.

औषधे (दर नियंत्रण) सुधारणा आदेशान्वये ही सुधारणा करण्यात आली आहे तर किरकोळ दर डीपीसीओ, २०१३ द्वारे निश्चित करण्यात आले आहेत. फार्मास्युटिकल उत्पादनांचे दर निश्चित करण्याची जबाबदारी एनपीपीएवर सोपविण्यात आली आहे.

परिणाम काय

औषधे नियंत्रणात आणण्याचा निर्णयाने अ‍ॅबट हेल्थकेअर, सिपला, ल्युपिन, अल्केम्बिक, अलकेम लॅबोरेटरीज, नोव्हार्टिस, रॅनबॅक्सी आदी कंपन्यांच्या उत्पादनांवर याचा परिणाम होणार आहे.

दर कसे ठरवतात :  ज्या जीवरक्षक औषधांची विक्री १ टक्यांपेक्षा जास्त आहे अशा औषधांच्या किंमती सरकार निश्चीत करते. एक वर्षांत अशा औषधांवर दहा टक्के वाढ करण्याची कंपन्यांना परवानगी असते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.