वृत्तसंस्था, राफा (गाझा पट्टी)

गाझा पट्टीतील मदत केंद्रावर येणाऱ्या नागरिकांवर इस्रायलच्या सैनिकांनी गोळीबार केल्यामुळे २७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पॅलेस्टिनी आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. गोळीबाराची तीन दिवसांतील ही तिसरी घटना आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निश्चित मार्ग सोडून इतरत्र जाणाऱ्या संशयितांवर इस्रायलच्या सैनिकांनी गोळीबार केल्याचे इस्रायलने म्हटले आहे. या लोकांना इशारा देण्यासाठी हवेत केलेल्या गोळीबाराकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचेही इस्रायली लष्कराने म्हटले आहे. इस्रायल आणि अमेरिकेने गाझा पट्टीत मदत निवारण केंद्राची स्थापना केल्यानंतर साधारणत: दररोज या ठिकाणी गोळीबार सुरू आहे. इस्रायलच्या लष्करी झोनमध्ये ही मदत केंद्रे असून, हमासचे मनसुबे उधळण्यासाठी इस्रायलने ही नीती आखली आहे. मात्र, मदतीचा वापर इस्रायल शस्त्र म्हणून करीत असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे.