scorecardresearch

हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी पकडला

मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा देखील हस्तगत

संग्रहीत
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे आज भारतीय लष्कर व स्पेशल ऑपेरशन ग्रुपच्या जवानांनी राबवलेल्या विशेष मोहीमेत हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यास अटक करण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी जवानांनी घटनास्थळावरून मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा देखील जप्त केला.

या अगोदर काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीर पोलिसांना दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाच्या एका दहशतवाद्यास अटक करण्यात यश आले होते. या अगोदर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस जवानांनी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या कारी यासीरसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. भारतीय जवानांचे हे देखील मोठे यश होते. या कारवाईत ठार करण्यात आलेला यासीर हा मागील वर्षी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी होता.

तर, दहा दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या शोपियन जिल्ह्यात जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. हे तिन्ही दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित होते. हे दहशतवादी एका घरामध्ये लपले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A hizbul mujahideen terrorist has been arrested with arms and ammunition msr