“आम आदमी पार्टीही लहान कान्हा सारखी आहे. ज्याप्रमाणे कान्हाने लहानपणी मोठ्या-मोठ्या राक्षसांना मारले होते, त्याचप्रमाणे एक छोटाशी “आम आदमी पार्टी” देशातील मोठ्या शक्तींशी लढत आहे.” असं विधान आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (रविवार) लोकप्रतिनिधींच्या परिषदेत बोलताना केले. त्याचबरोबर ते म्हणाले की, “जे लाल किल्ल्यावरून म्हणतात की मी भ्रष्टाचाराशी लढत आहे, ते आम आदमी पार्टीबरोबर भ्रष्टाचाराशी लढत नाहीत.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अरविंद केजरीवाल म्हणाले की, “जगाच्या इतिहासात एवढ्या वेगाने कोणताही पक्ष वाढला नाही. एक दहा वर्षांचा पक्ष आहे आणि समोर एवढे बलाढ्या जुने पक्ष आहेत. आपण ऐकलं आहे की, भगवान श्रीकृष्ण यांना त्यांच्या लहानपणी कान्हा म्हटलं जायचं. आपल्या लहानपणी कान्हानी अनेक शक्तीशाली राक्षसांचा वध केला होता. ही आम आदमी पार्टीदेखील छोटीशी पार्टी आहे आणि कान्हा सारखीच आहे. आपल्या समोरील बलाढ्या राक्षसांचा वध करत आहे.वध म्हणजे कुणाचा खून करत नाही. तर भ्रष्टाचार, बेरोजगारी, महागाईचा वध करत आहे. ज्या प्रमाणे भगवान श्रीकृष्णाने लहानपणी कमी वयात मोठ्या राक्षसांचा वध केला होता. त्याचप्रमाणे केवळ दहा वर्ष जुनी आम आदमी पार्टी समोरील शक्तींसोबत लढत आहे.” असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

याचबरोबर “आम आदमी पार्टीच्या चार गोष्टी म्हणजे प्रामाणिकपणा, शिक्षण, आरोग्य सेवा आणि मोफत सुविधा लोकांना आवडत आहेत. राजकारणाचे दोन प्रकार असल्याचेही ते म्हणाले. एक पैसा कमावतो, घर भरतो आणि मग पिढ्यांपिढ्या बसून खातात. तर, जनतेला सर्व काही मोफत देणारे दुसरे राजकारण आहे. काही लोक म्हणतात फुकटच्या सोयी मिळू नये. मग समजावे की त्यांना मित्रांचे पोट भरायचे आहे. जनतेला मोफत सुविधा देण्यास विरोध करणाऱ्यांचा विचार चांगले नाहीत.” असंदेखील यावेळी केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aam aadmi party is like a small kanha killing demons for ten years arvind kejriwal msr
First published on: 18-09-2022 at 14:10 IST