scorecardresearch

उदयपूर हत्या प्रकरण; आरोपीचे पाकिस्तानातील ‘दावत-ए-इस्लाम’ संघटनेशी संबंध

राजस्थानमधील उदयपूरमध्ये नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्यामुळे कन्हैयालाल नावाच्या व्यक्तीचा गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे.

आरोपी मोहम्मद रियाझ आणि घौस मोहम्मद

राजस्थानमधील उदयपूरमध्ये कन्हैयालाल नावाच्या व्यक्तीच्या हत्येनंतर खळबळ माजली आहे. कन्हैयालालने नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यामुळे दोन इस्लामिक कट्टरपंथी व्यक्तींनी दुकानात घूसन त्याची हत्या केल्याची घटना घडली होती. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी मोहम्मद रियाझ आणि घौस मोहम्मदला अटक केली आहे. घौस मोहम्मदचा पाकिस्तानातील इस्लामी संघटना दावत-ए-इस्लामीशी संबंध असल्याचे समोर आले आहे.

दोन मुख्य आरोपींसह पाच जणांना अटक

घौस मोहम्मद या आरोपीचा कराचीस्थित इस्लामी संघटना दावत-ए-इस्लामीशी संबंध आहे. त्याने २०१४ मध्ये कराचीला भेट दिली होती. आतापर्यंत या हत्येप्रकरणी दोन प्रमुख आरोपींसह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दावत-ए-इस्लामी ही पाकिस्तानातील एक धार्मिक चळवळ चालवणारी संस्था आहे. ती प्रेषित मुहम्मद यांच्या संदेशाचा प्रचार करणारी संस्था असल्याचा दावा करते. या संस्थेच्या माध्यामतून लोकांना ऑनलाइन इस्लामीक अभ्यासाचे धडे दिले जातात. तसेच या संस्थेमार्फत धर्मांतर आणि कट्टरपंथी बनवण्यासाठी विशेष प्रशिक्षणही दिले जाते.

पाहा व्हिडीओ –

काय आहे प्रकरण?
राजस्थानमधील उदयपूरमध्ये नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्यामुळे कन्हैयालाल नावाच्या व्यक्तीचा गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. आरोपींनी कन्हैयालालची मानेवर धारदार शस्त्राने वार केले. कन्हैयालालच्या मोबाईलवरून नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ काही व्हॉट्सअॅप ग्रुप्समध्ये पोस्ट फॉरवर्ड करण्यात आल्या होत्या. त्यामुळे संतापलेल्या दोन इस्लामिक युवकांनी दुकानात घूसून कन्हैयालालची हत्या केली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Accused in udaipur murder case has links with dawat e islam organization in pakistan dpj

ताज्या बातम्या