Acharya Pramod Krishnam : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपाने बटेंगे तो कटेंगे असा सूचक इशारा मतदारांना दिलाय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं हे वक्तव्य असून महाराष्ट्रातही त्याचा वापर केला जातोय. यावरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी योगी आदित्यनाथांवर टीका केली. या टीकेवरून आता काँग्रेसचे माजी नेते कल्की पीठाधेश्वर आचार्य प्रमोद कृष्णम यांनी प्रतिहल्ला केला आहे. डेक्कन हेराल्डने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

मल्लिकार्जून खरगे यांनी योगी आदित्यनाथांवर नागपूर येथील रॅलीत टीका केली होती. बटेंगे तो कटेंगेचा नारा समाजात पूट पाडणारा आहे, असं खरगे म्हणाले होते. तसंच, झारखंड येथील रॅलीत खरगे म्हणाले होते की, खरा योगी बटेंगे तो कटेंगेसारखी भाषा करत नाही. अशी भाषा दहशतवाद्यांकडून वापरली जाते. योगी आदित्यनाथ हे मठाचे अध्यक्ष आहेत. भगवं वस्त्र परिधान करतात. पण त्यांचा स्वभाव मुख मे राम और बगल मे छुरी सारखा आहे. ज्यांना अखंड देश हवा असतो त्यांनी अशी वक्तव्ये टाळली पाहिजेत, असंही ते म्हणाले.

हेही वाचा >> Raosaheb Danave Viral Video : फोटो फ्रेममध्ये येणाऱ्या कार्यकर्त्याला रावसाहेब दानवेंनी लाथाडलं; VIDEO व्हायरल!

…तर त्याला भारतीय राजकारणात स्थान नाही

l

खरगे यांच्या या वक्तव्यावर प्रमोद आचार्य म्हणाले, मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाप्रमाणे ते तर हिंदू वाटतात. पण त्यांची कृती तशी वाटत नाही. त्यांच्या वक्तव्यातून सनातन धर्माविषयी द्वेष दिसतोय. सनातन धर्म आणि संतांविषयी ज्यांच्या मनात राग असतो त्यांना भारतीय राजकारणात स्थान नाही. खरगेंनी सनातन धर्म, हिंदू संतांचा आणि भगव्या वस्त्राचा अपमान करणं थांबवावं. खरे हिंदू कधीच आपल्या धर्मातील व्यक्तींचा अनादर करत नाहीत, असंही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपुरात काय म्हणाले होते खरगे?

काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांनी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील सरकारला ‘तोडफोड सरकार’ म्हटले. तसेच विचारधारेवर न चालणाऱ्या पक्षाला अशाप्रकारे केवळ सत्ताप्राप्तीसाठी तोडफोड करून सरकार स्थापनेचा अधिकार नसल्याची टीका केली. भाजप निवडणूक प्रचारातील भाषणातून लोकांना त्यांच्या खऱ्या समस्यांपासून लक्ष विचलित आणि दिशाभूल करत आहेत. अशाप्रकारे भडकाऊ भाषण देऊन लोकांच्या भावना भडकवण्यापेक्षा केलेल्या कामांवर मत का मागण्याची धाडस का होत नाही, असा प्रश्नही खरगे यांनी केला होता.