वृत्तसंस्था, लॉस एंजेलिस
अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे बेकायदा स्थलांतरितांवरील कारवाईच्या विरोधात होत असलेले आंदोलन आटोक्यात आणण्यासाठी मंगळवारी रात्री शहराच्या मुख्य भागात संचारबंदी लागू करण्यात आली. त्यानंतर आंदोलकांना सामूहिकरीत्या अटक करण्यास सुरुवात झाली. आंदोलनाचा मंगळवारी सलग पाचवा दिवस होता. ‘नॅशनल गार्ड’नी आंदोलकांच्या सुरू असलेल्या अटकसत्रात सहभाग घेतला नाही.
लॉस एंजेलिसच्या महापौर कॅरन बेस यांनी आंदोलनाच्या पाचव्या दिवशी आंदोलन सुरू असलेल्या अडीच चौरस किलोमीटर परिसरात संचारबंदी लागू करण्याची घोषणा केली. मंगळवारी रात्री आठपासून बुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू करण्यात आली. आणखी काही दिवस ही संचारबंदी असेल, असे त्या म्हणाल्या.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार तैनात असलेले ‘नॅशनल गार्ड’ अटकसत्रापासून लांब राहिले. काही तासांनी आंदोलकांना पांगविण्यात सुरक्षा दलांना यश आले. काही ठिकाणी संघर्ष सुरू असला, तरी त्याची तीव्रता फारशी नाही.
आंदोलनाचे लोण इतर शहरांत
या आंदोलनाचे लोण डलास, ऑस्टिन, टेक्सास, शिकागो, न्यूयॉर्क या शहरांतही पसरले असून, हजारो नागरिकांनी रॅलीमध्ये भाग घेतला. अनेकांना या वेळी अटक करण्यात आली. टेक्सासमध्ये पोलिसांनी गर्दीला पांगविण्यासाठी कमी तीव्रतेच्या रसायनांचा वापर केला. आंदोलनाच्या ठिकाणी ‘टेक्सास नॅशनल गार्ड’ सज्ज राहण्यासाठी तयार आहेत, असे रिपब्लिकन पक्षाचे गव्हर्नर ग्रेग अॅबट यांच्या कार्यालयाने सांगितले.

(आंदोलन होणारे) कॅलिफोर्निया हे पहिले राज्य कदाचित असेल. पण, हे इथेच थांबणार नाही. इतर राज्यांतही आंदोलने होतील. तुम्ही हिंसा करू नका. पण, अध्यक्ष ट्रम्पना शरणही जाऊ नका. ट्रम्प यांचा हा लोकशाहीवरील हल्ला आहे. – गेविन न्यूसम, गव्हर्नर, कॅलिफोर्निया