Al qaida : भारतात हल्ले घडवून अधिकाऱयांना ठार मारा, ‘अल-कायदा’चे मुस्लिमांना फूस लावण्याचे प्रयत्न

भारतातील मुस्लिमांना देशात हल्ले घडवून आणण्याचे आवाहन केले आहे.

अमेरिकेने उमरच्या संघटनेला 'परदेशी दहशतवादी संघटना' म्हणून आणि उमर याला 'जागतिक दहशतवादी' घोषित केल्याच्या चार दिवसांनी उमर याने भारतातील मुस्लिमांना देशात हल्ले घडवून आणण्याचे आवाहन केले आहे.

बांगलादेशची राजधानी ढाका येथील दहशतवादी हल्ल्यानंतर अल-कायदा या दहशतवादी संघटनेने आता भारतातील मुस्लिम नागरिकांना प्रशासनाविरोधात आवाज उठविण्याचे आवाहन केले आहे. भारतातील मुस्लिमांनी देशात हल्ले घडवून आणावेत आणि देशातील पोलीस अधिकाऱयांना ठार मारावे, असे पत्रक ‘अल-कायदा’च्या भारतीय उपखंडाचा प्रमुख असिम उमर याने जारी केले आहे.
अल-कायदा ही दहशतवादी संघटना भारतीयांची संघटनेत भरती करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून विविध मार्गाने प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. त्यात अमेरिकेने उमरच्या संघटनेला ‘परदेशी दहशतवादी संघटना’ म्हणून आणि उमर याला ‘जागतिक दहशतवादी’ घोषित केल्याच्या चार दिवसांनी उमर याने भारतातील मुस्लिमांना देशात हल्ले घडवून आणण्याचे आवाहन केले आहे.
अमेरिकास्थित एका पोर्टलने जाहीर केलेल्या माहितीत देखील अल-कायदा आणि आयसिस या दोन्ही संघटना आपल्या ताफ्यात भारतीयांची भरती करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Al qaida asks indians to launch lone wolf operations in country