चीनच्या कथित हेरगिरी करणाऱ्या ‘बलून’ला अमेरिकेने हवेतच नष्ट केले आहे. याआधी हा बलून उत्तर अमेरिकेतील संवेदनशील लष्करी भागांवर पाळत ठेवत होता, असा दावा अमेरिकेने केला होता. याच कारणामुळे आता चीन-अमेरिका यांच्यातील राजकीय, व्यापारविषयक संबंधांत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा>>> पाकिस्तानात ‘विकिपीडिया’वर बंदी; ईश्वरिनदाविषयक मजकूर न हटवल्याने कारवाई

समुद्रात जहाजे तैनात करण्यात आली होती

अमेरिकेने चीनच्या या बलूनला हवेतच उडवले आहे. या कारवाईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बलून खाली येताना दिसत आहे. बलून नष्ट केल्यानंतर तो समुद्राच्या पाण्यातच पडावा, अशा पद्धतीने या कारवाईचे नियोजन करण्यात आले होते. तसेच या अवशेष भाग जमा करण्यासाठी समुद्रात जहाजे तैनात करण्यात आली होती. जहाजांच्या माध्यमातून बलूनचे जास्तीत जास्त अवशेष जमा करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

हेही वाचा>>> मतभिन्नता हा मूलभूत हक्कांचाच भाग! दिल्ली न्यायालयाचे भाष्य, शर्जिल इमामसह ११ जण आरोपमुक्त

बलूनला उडवण्याच्या काही तास अगोदरच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बयडेन यांनी आम्ही या बलूनची काळजी घेऊ असे विधान केले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. हा बलून सर्वांत अगोदर २८ जानेवारी रोजी अमेरिकेच्या हवाई हद्दीत आढळला होता.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांचा चीन दौरा रद्द

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शुक्रवारी चीनने अमेरिकेच्या हवाई हद्दीत आढळलेला हा बलून आमचाच आहे, असे स्पष्टीकरण दिले होते. तसेच या बलूनच्या माध्यमातून पर्यावरणविषयक संशोधनक करण्यात येत असून तो चुकून अमेरिकेच्या हद्दीत गेला, असेही चीनने सांगितले होते. या घटनेमुळे मात्र अमेरिका-चीन यांच्या राजकीय संबंधांत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी चीन दौरा रद्द केला आहे.