महिंद्रा उद्योग समूहाने लष्करात चार वर्षांच्या सेवेनंतर ‘अग्निवीरांच्या’ भरतीची घोषणा केली आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. ‘अग्निपथ’ योजनेवरून सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले. यासोबतच त्यांनी अग्निवीरांना मिळालेले प्रशिक्षण विशेष असल्याचे सांगितले आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये या योजनेच्या विरोधात आंदोलने सुरू आहेत. दरम्यान, अनेक संघटनांनी सोमवारी भारत बंदची घोषणा केली आहे.

“अग्निपथ योजनेवर सुरू असलेल्या विरोधामुळे दुःखी आहे. गेल्या वर्षी जेव्हा या योजनेचा विचार केला गेला तेव्हा मी म्हणालो होतो आणि मी पुनरुच्चार केला होता की अग्निवीर जी शिस्त आणि कौशल्ये शिकेल ते त्याला विशेषतः रोजगारक्षम बनवेल. महिंद्रा समूह अशा प्रशिक्षित, सक्षम तरुणांना नियुक्त करण्याच्या या संधीचे स्वागत करतो, असे आनंद महिंद्रा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

अनेक आंदोलकांनी अग्निवीरांच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. नवीन योजनेनुसार, अग्निपथद्वारे भरती झालेल्या अग्निवीरांना चार वर्षांसाठी सैन्यात सेवा करण्याची संधी मिळेल. मात्र, या कालावधीनंतर २५ टक्के सैनिकांच्या सेवेचा विस्तार करण्याची चर्चा लष्कराने केली आहे. पूर्वी सैनिक २० वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करायचे.

“भाजपा कार्यालयामध्ये सुरक्षारक्षक ठेवायचा असेल तर अग्निवीरला प्राधान्य देऊ”; कैलास विजयवर्गीय यांचे वक्तव्य

दरम्यान, देशभर हिंसक विरोध झालेल्या वादग्रस्त अग्निपथ योजनेच्या अंमलबजावणीवर सरकार ठाम असून लष्कराच्या तिन्ही सेवांनी रविवारी अग्निवीरांच्या भरतीचा व्यापक कार्यक्रम जाहीर केला. लष्कराने सांगितले की, ‘अग्नवीर’ ही भारतीय सैन्यात एक वेगळी श्रेणी असेल आणि ते कोणत्याही रेजिमेंटमध्ये भरती केले जाऊ शकतात. लष्कराने सांगितले की, अधिकृत गुप्तता कायदा, १९२३ अंतर्गत, अग्निवीरांना चार वर्षांच्या सेवेदरम्यान मिळालेली गोपनीय माहिती कोणत्याही अनधिकृत व्यक्ती किंवा स्त्रोताकडे उघड करण्यास मनाई असेल.

विश्लेषण : बिहारमध्ये रेल्वे गाड्यांचे नुकसान; सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीबाबत कायदा काय सांगतो?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याचबरोबर, ‘अग्निपथ’ विरोधातील जाळपोळ आणि तोडफोडीत सामील झालेल्या तरुणांना या योजनेची दारे बंद असतील, असा इशाराही दिला. ‘अग्निपथ’मध्ये भरती होताना अर्जदार तरुणांना, या योजनेच्या विरोधातील जाळपोळीत सामील नसल्याचे किंवा आंदोलनात भाग घेतला नसल्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे. लष्करी व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव लेफ्टनंट जनरल अनिल पुरी म्हणाले, ‘‘शिस्त हा भारतीय संरक्षण दलाचा पाया आहे. येथे जाळपोळ-तोडफोड आणि निदर्शनांना थारा नाही.’’ अग्निपथ योजनेंतर्गत भरतीसाठी अर्ज दाखल करताना संबंधित उमेदवाराला या योजनेविरोधातील कोणत्याही स्वरूपाच्या आंदोलनात सामील न झाल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल. तसेच प्रत्येक उमेदवाराची पोलीस पडताळणी करण्यात येईल. एखाद्याविरुद्ध गुन्हा (एफआयआर) दाखल असेल, तर त्याला भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही, असेही लेफ्टनंट जनरल पुरी यांनी नमूद केले.