इराकमधील कुरदिस्तान भागात दुष्काळामुळे पाणी आटून धरणाखाली तब्बल ३ हजार ४०० वर्षांपूर्वीचं एक पुरातन शहर सापडलं आहे. हे धरण इराकमधील सर्वात मोठं धरण आहे. धरणाच्या पात्रात सापडलेलं हे शहर कांस्ययुगातील असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यानंतर पुरातत्व विभागाने तातडीने या पुरातन शहराच्या उत्खननाला सुरुवात केली आहे. धरणातील पाणीसाठा वाढून पुन्हा हे शहर पाण्याखाली जाण्याआधी हे उत्खनन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

जर्मन आणि कुर्दिश पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मते, हे पुरातन शहर इसवी सन पूर्व १५५० ते १३५० काळातील मित्तानी साम्राज्याचं प्रमुख शहर असू शकतं. हे शहर टायग्रीस नदीच्या पात्रातच वसलेलं आढळल्याने या शहराचा साम्राज्याच्या इतर भागाशी संपर्कात महत्त्वाची भूमिका असू शकते अशी शक्यता पुरातत्व पथकाने व्यक्त केली आहे. सद्यस्थितीत मित्तानी साम्राज्याचा हा भाग म्हणजे ईशान्य सिरिया आणि पूर्व भाग आहे.

हेही वाचा : निव्वळ दगडांची शस्त्रे घेऊन दोन लाख वर्षांपूर्वी माणसाने स्थलांतर कसे आणि का केले असेल?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे पुरातन शहर नदी पात्रात असल्याने धरणातील पाण्याची पातळी वाढेल तसं हे शहर पुन्हा पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. त्यामुळे पुन्हा हे पुरातन शहर पाण्याखाली जाऊन त्याचं नुकसान होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात आल्यात. पुरातत्व विभागाच्या पथकाने हे संपूर्ण शहर प्लास्टिक कोटिंगच्या मदतीने झाकलं आहे. जेणेकरून पुन्हा त्याचा पाण्याशी संपर्क येऊन नुकसान होणार नाही.