Asaduddin Owaisi on Pakistan : एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहेत. जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जण ठार झाले, यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला. यादरम्यान दोन्ही देशांमधील वाढलेल्या तणावादरम्यान ओवेसी यांनी वेळोवेळी पाकिस्तानाला प्रत्युत्तर दिलं आहे. आज पु्न्हा एकदा किस्तानला सुनावले आहे. याबोरबरच पाकिस्तानमध्ये होत असलेल्या चर्चा आणि सोशल मीडियावर होत असलेल्या ट्रोलिंगवर देखील भाष्य केले आहे. माझं बोलणं ऐकल्याने पाकिस्तानातील लोकांच्या ज्ञानात वाढ होईल असेही ओवेसी यावेळी म्हणाले आहेत.

ओवेसी काय म्हणाले?

पाकिस्तानात त्यांच्याबद्दल होत असलेल्या चर्चांवर बोलताना ते म्हणाले की, सध्या पाकिस्तानच्या निशाण्यावर मीच आहे. ओवेसी पुढे म्हणाले पाकिस्तानवाल्यांना त्यांच्या इतका स्पष्टवक्ता आणि इतका हँडसम कोणी दिसतच नाहीये. भारताकडून फक्त तेच दिसत आहेत. ते पाकिस्तानबद्दल बोलताना म्हणाले की, “पाहात राहा, तुमच्या डोक्यात जो भुसा भरलेला आहे, तो साफ होईल, तुमच्या ज्ञानात भार पडेल आणि अज्ञान कमी होईल.”

हैदराबादचे लोकसभा खासदार असदुद्दीन ओवीसी यांनी पाकिस्तान दहशतवादाचा पुरस्कर्ता असल्याचे सांगत कडाडून टीका केली आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानने त्यांच्या दीर्घकाळच्या इतिहासातून स्पष्ट केले आहे की तो देश मानवतेसाठी धोका आहे. शनिवारी दिलेल्या एका मुलाखतीत ओवेसी म्हणाले की भारताने आता आंतरराष्ट्रीय समुदायासमोर स्पष्ट केले पाहिजे की तो अनेक दशकांपासून पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाचा बळी ठरत आला आहे.

असदुद्दीन ओवेसी म्हणाले की मुहम्मद जिया-उल-हकच्या काळापासून ते कंधार विमान अपहरण, २६/११ मुंबई हल्ला, संसदेवरील हल्ला, उरी, पठाणकोट आणि नुकतेच पहलगाम येथे पर्यटकांची हल्या इथपर्यंत पाकिस्तानची भूमिका स्पष्ट दिसून येते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानकडून स्वतःला मुस्लिम देश म्हणून सादर केले जात असल्याबद्दलही ओवेसी यांनी भाष्य केले. ते म्हणाले की भारतात सुमारे २० कोटी मुस्लिम राहतात. पाकिस्तानचा हा दावा देखील चुकीचा आहे, जगाला हे देखील सांगणे आवश्यक आहे.