Delhi University Students Union Attack : दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या (DUSU) कार्यालयात रविवारी पहाटे गोंधळ आणि तोडफोड करण्यात आली आहे. DUSU चे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यात हाणामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे. डीयूएसयूचे अध्यक्ष तुषार देधा हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (एबीव्हीपी) तर उपाध्यक्ष अभि दहिया हे एनएसयूआयचे आहेत. दुसरीकडे अभाविपने या घटनेनंतर कार्यालयाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून अध्यक्ष आणि सचिवांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याचा आरोप करत पोलिसांकडून कारवाईची मागणी केली आहे.
या घटनेची माहिती देताना दिल्ली पोलिसांनी सांगितले की, ही घटना काल रात्री घडली. अभाविप आणि एनएसयूआयच्या सदस्यांमध्ये Delhi University Students Union च्या कार्यालयात खडाजंगी झाली. कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणात कोणालाही दुखापत झाली नाही. दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की आमच्याकडे दोन्हीकडून कोणतीही तक्रार आलेली नाही. मात्र, पोलीस घटनास्थळी उपस्थित असलेल्या गार्डचा जबाब नोंदवला असून, निवेदनाच्या आधारे कायदेशीर कारवाई केली जाईल. दोन्ही बाजूंशीही संपर्क साधला जाणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
VIDEO | Inside visuals from Delhi University Students Union (DUSU) office in New Delhi after it was allegedly attacked by NSUI members earlier today.
— Press Trust of India (@PTI_News) July 14, 2024
(Full video available on PTI Videos- https://t.co/dv5TRARJn4) pic.twitter.com/NO0e0xfuvw
एबीव्हीपीचा एनएसयूआयवर आरोप
दरम्यान, एनएसयूआयच्या सदस्यांनी दारूच्या नशेत विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयात गोंधळ घातल्याचा आरोप अभाविपने केला आहे. ‘X’ वर कार्यालयाचा व्हिडिओ जारी करताना, ABVP ने म्हटलंय की, “पहाटे ३-४ वाजता NSUI चे गुंड दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयात (Delhi University Students Union) घुसले आणि गोंधळ घातला. अध्यक्ष तुषार देढा व सचिव अपराजित यांच्या कार्यालयाचा दरवाजा तोडून कार्यालयाची तोडफोड केली. ABVP दिल्ली या घटनेचा निषेध करते आणि दिल्ली पोलिसांना NSUI गुंडांवर कारवाई करण्याचे आवाहन करते.
Drunk #NSUI goons wreak havoc in DUSU office
— ABVP Delhi (@ABVPDelhi) July 14, 2024
Between 3-4 AM this morning, NSUI goons broke into the Delhi University Students' Union office, causing chaos. They broke the doors of the offices of President @TUSHARDEDHAABVP and Secretary @Aprajitadu, vandalized the office and… pic.twitter.com/F92kHvdhBw
हा विद्यार्थ्यांच्या आदेशावर हल्ला असल्याचे अभाविपने कार्यालयात ठिकठिकाणी गोंधळ घातला. शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये ऑफिसच्या टेबलाची काच फुटली आहे. तेथे असलेले सामानही विखुरलेले आहे, खुर्चीही तुटलेली असून सर्वत्र वस्तू विखुरलेल्या आहेत. सोफ्यावर काच विखुरलेल्या आहेत. वॉटर कुलरही तुटलेला आहे. मात्र, एनएसयूआयकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.