देशात करोना प्रकोपामुळे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत. अनेक राज्यांमध्ये लॉकडाउनची स्थिती उद्धभवली आहे. दिल्ली ६ दिवसांचा लॉकडाउन लावण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातही करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. करोना फैलाव पाहता श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासानं रामनवमीला राम जन्मभूमी मंदिरात भक्तांना प्रवेश बंदी केली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्रनं ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘करोनाच्या वाढत्या फैलावामुळे श्री राम जन्मभूमी परिसरात प्रभू रामांचा जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने मुख्य पुजाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा केला जाणार आहे. मात्र या जन्मोत्सव सोहळ्याला भक्तांना परवानगी नसेल.’, असं श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राकडून ट्विटरवर सांगण्यात आलं आहे.

राम जन्मभूमीत रामनवमीला जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अयोध्या नगरीला आकर्षक रोषणाई केली जाते. मंदिर परिसर फुलांनी सजवला जातो. या सोहळ्याला भक्तही मोठ्या संख्येने हजेरी लावतात. मात्र करोनामुळे अयोध्येत भक्तांना परवानगी नाकारण्यात आली आहे. याव्यतिरिक्त अयोध्येतील यात्राही रद्द करण्यात आली आहे. साधुसंत आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भक्तांना अयोध्येत न येण्याचं आवाहन केलं आहे. अयोध्येतील संत समाजाने नागरिकांना घरीच रामजन्मोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayodhya ramnavami festival bhakt will no allowed due corona virus spread rmt
First published on: 19-04-2021 at 19:16 IST