करोनावरील औषध कधी येतं याची प्रतीक्षा असणाऱ्या साऱ्यांनाच धक्का देत योगगुरू रामदेव बाबा यांनी करोनावर भल्यामोठ्या पत्रकार परिषदेत औषध लाँच केलं. “करोनावर १०० टक्के लागू होणारं औषध आणि ७ दिवसांत करोना बरा होईल,” असा दावाही रामदेव बाबा यांच्या पतंजलीनं केला होता. या औषधाची किंमत आणि ते सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल की नाही, या बाबी आता समोर आल्या आहेत.

हे औषध लाँच करताना बाबा रामदेव म्हणाले होते की, “जग ज्या क्षणाची प्रतीक्षा करत होता तो क्षण आता आला आहे. करोनावरील पहिलं आयुर्वेदिक औषध तयार करण्यात आलं आहे. या औषधाच्या मदतीनं करोनाच्या सर्व प्रकारच्या गुंतागुंतीवर नियंत्रण ठेवू शकू. या औषधाच्या साहाय्यानं तीन दिवसांच्या आत ६९ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. तर ७ दिवसांमध्ये १०० टक्के रुग्णांनी करोनावर मात केली आहे. या औषधाची चाचणी २८० जणांवर करण्यात आली आहे.”

Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
salman khan house firing case abhishek ghosalkar wife
सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल; म्हणाल्या, “मला सुरक्षा का नाही?”
Important decision of the supreme court
उमेदवारांनी संपत्ती म्हणून घड्याळही जाहीर करावं का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल; मालमत्ता प्रकरणी दिला महत्त्वपूर्ण निकाल
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा

पण करोनिल हे औषध लाँच होताच आयुष मंत्रालयानं पतंजलीच्या या आयुर्वेदिक औषधाची वैधता तपासण्याचा निर्णय घेतला. तसेच याच्या संशोधनाचे सर्व कागदपत्रही मागितले. बुधवारी पतंजलीनं ते आयुष मंत्रालयाला दिले आहेत. मात्र आयुष मंत्रालयानं या औषधाच्या विक्री आणि विपणनावर स्थगिती आणली. जोवर यासंबंधी टास्कफोर्स निर्णय देत नाही, तोवर पतंजलीला हे औषध विकता येणार नाही किंवा त्याचं प्रमोशन करता येणार नाही, असं आयुष मंत्रालयानं स्पष्ट केलं.

करोनावरी औषध असं म्हटलेल्या करोनिलची किंमत किती?
पतंजलीनं करोनावरी औषध म्हणून एक किटच लाँच केली आहे. या किटमध्ये ३० दिवसांचे डोस आहेत. यासाठी ५४५ रुपये किंमत मोजावी लागेल, असं कंपनीनं म्हटलं आहे. सात दिवसांत हे करोनिल औषध बाजारात उपलब्ध होईल, असा दावा पतंजलीनं केला होता. पण, अजूनही या औषधाच्या विक्रीला आयुष मंत्रालयानं परवानगी दिलेली नाही. त्यामुळे ते सध्या तरी बाजारात उपलब्ध होणार नाही.