बांगलादेशने रविवारी नवीन चलनी नोटा अनावरण केल्या. त्यांच्या चलनी नोटांवर मुजीबुर रहमान यांची प्रतिमा होती. पण आता याजागी प्रसिद्ध कलाकृती आणि मंदिरांच्या प्रतिमा छापल्या आहेत. १९७१ मध्ये देशाची स्थापना झाल्यापासून बांगलादेशचे पहिले राष्ट्रपती सर्व नोटांवर चित्रित आहेत. बांगलादेशातील १८ व्या शतकातील कांताजेव मंदिराची प्रतिमा बांगलादेशच्या २० टकाच्या चलनी नोटेवर छापली जाणार आहे. या मंदिरावर २०१५ मध्ये बॉम्ब हल्ला झाला होता. या मंदिराचा समृद्ध इतिहास आहे.

नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने गेल्या वर्षी ‘बांगलादेशच्या ऐतिहासिक आणि पुरातत्वीय वास्तुकला’ या नवीन थीमसह टप्प्याटप्प्याने बांगलादेशी चलनाचे नूतनीकरण करण्याची योजना जाहीर केली होती. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, रविवारी १०००, ५० आणि २० रुपयांच्या नवीन नोटा बाजारात आणल्या, ज्यात हिंदू आणि बौद्ध मंदिरे आणि प्रसिद्ध कलाकृतींचा समावेश आहे. अधिकाऱ्यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला सूचित केले होते की सर्व मूल्यांच्या नोटांसाठी नवीन डिझाइन सादर केले जातील. नवीन सुधारित चलनी नोटा सुरुवातीला बांगलादेश बँकेच्या ढाका येथील मुख्य कार्यालयातून जारी केल्या जातील. बांगलादेशचे राष्ट्रपिता मुजबीर रहमान यांचं चित्र असलेल्या विद्यमान नोटा आणि नाणी नवीन नोटांसोबतच चलनात राहतील.

“नवीन डिझाइनमध्ये, नोटांमध्ये कोणतेही मानवी चित्रे नसतील, तर त्याऐवजी नैसर्गिक लँडस्केप आणि पारंपारिक खुणा प्रदर्शित केल्या जातील. नवीन नोटा मध्यवर्ती बँकेच्या मुख्यालयातून आणि नंतर देशभरातील इतर कार्यालयांमधून जारी केल्या जातील”, असं बांगलादेश बँकेचे प्रवक्ते आरिफ हुसेन खान यांनी एएफपीला सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवीन नोट्समध्ये हिंदू आणि बौद्ध मंदिरे, दिवंगत जैनुल आबेदीन यांच्या कलाकृती आणि १९७१ च्या मुक्ती युद्धात मृत्युमुखी पडलेल्यांचा सन्मान करणारे राष्ट्रीय शहीद स्मारक यांच्या प्रतिमा असतील.