आर्थिक वर्ष २०२३-२४ चा पहिला महिना संपायला अगदी चार दिवस शिल्लक राहिले आहेत. यानंतर नवीन महिना सुरु होईल. मे महिना सुरु होण्यापूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेने सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे मे महिन्यात तुम्हाला बँकांसंबंधीत काही महत्वाची कामे म्हणजे, पैशांचे व्यवहार, डिमांड ड्राफ्ट प्राप्त करणे, चेक जमा करणे, पासबुक एन्ट्री करण्यासाठी जाणार असल्यास ही सुट्ट्यांची लिस्ट पाहूनच घराबाहेर पडा. किंवा सुट्ट्यांच्या आधी ही महत्वाची कामे उरकून टाका.

तुम्हाला मे महिन्यात काही महत्वाची कामे करायची असल्यास तुम्हाला बँकेला कधी सुट्टी असते याची माहिती असली पाहिजे. मे २०२३ मध्ये देशभरातील बँका १२ दिवस बंद राहणार आहे. सण, जयंती इत्यादी कारणामुळे ह्या सुट्ट्या असतील. ज्यात रविवार शनिवारच्या सुटट्यांच्याही समावेश आहे. मे महिन्यात महाराष्ट्र दिन, बुद्ध पौर्णिमा, महाराणा प्रताप जयंती, रविंद्रनाथ टागोर जयंती असे अनेक महत्त्वाचे दिवस आहेत. त्यामुळे विविध राज्यात अनेक दिवस बँकांमध्ये कामकाम होणार नाही. पण या सुट्ट्या राज्यांनुसार बदलत्या आहेत. जाणून घेऊ सुट्ट्यांची यादी…

अमेरिकेतील कमी कुशल भारतीयांच्या उत्पन्नात ५०० टक्क्यांनी वाढ, तर आखाती देशांतील लोकांचे उत्पन्न कमीच, अहवालातून उघड

मे महिन्यात महाराष्ट्रात किती दिवस बँका बंद राहतील?

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, महाराष्ट्रात मे महिन्यात बँका तब्बल ८ दिवस बंद राहणार आहेत. यात महाराष्ट्र दिन, बुद्ध पौर्णिमा आणि शनिवार- रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे.

१ मे २०२३ – महाराष्ट्र् दिन

५ मे २०२३ – बुद्ध पौर्णिमा

७ मे २०२३ – रविवार

१३ मे २०२३ दुसरा शनिवार

१४ मे २०२३ – रविवार

२७ मे २०२३ – चौथा शनिवार

२८ मे २०२३ – रविवार

मे २०२३ मधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी

१ मे २०२३ – महाराष्ट्र दिनानिमित्त बेलापूर, बेंगळुरू, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, कोची, कोलकाता, मुंबई, नागपूर, पणजी, पाटणा आणि त्रिवेंद्रममध्ये बँका बंद राहतील.

५ मे २०२३- बुद्ध पौर्णिमेनिमित्त आगरतळा, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, जम्मू, कानपूर, कोलकाता, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहणार

७ मे २०२३- रविवार (संपूर्ण देशभरात बँका बंद)

९ मे २०२३ – रवींद्रनाथ टागोर जयंतीनिमित्त कोलकातामध्ये बँका बंद राहणार.

१३ मे २०२३- दुसरा शनिवार (संपूर्ण देशात बँका बंद )

१४ मे २०२३- रविवार (देशभरात बँका बंद राहतील)

१६ मे २०२३- सिक्कीम राज्य दिन (सिक्कीममध्ये बँका बंद राहतील)

२१ मे २०२३- रविवार (संपूर्ण देशभरात बँकांना सुट्टी असेल)

२२ मे २०२३- महाराणा प्रताप जयंती (शिमल्यात बँका बंद राहतील.)

२४ मे २०२३- काझी नजरुल इस्लाम जयंती (त्रिपुरातील बँका बंद राहतील)

२७ मे २०२३- चौथ्या शनिवार (संपूर्ण देशातील बँका बंद राहतील)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२८ मे २०२३- रविवार (संपूर्ण देशात बँकांना सुट्टी असेल)