बॉम्ब हल्ल्याच्या शक्यतेमुळे मंगळवारी रात्री लंडनमधील ‘बीबीसी’ या वृत्तसंस्थेचे मुख्यालय पोलिसांकडून रिकामे करण्यात आले आहे. या परिसरात संशयास्पद वाहन मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ या वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर हे वृत्त प्रकाशित करण्यात आले आहे. याशिवाय, ऐतिहासिक लंडन ब्रीज आणि हेझ गॅलरिआ येथील परिसरदेखील सुरक्षेच्या कारणास्तव रिकामा करण्यात आला आहे. येथील सुरक्षा यंत्रणांना मंगळवारी या भागात काही संशयास्पद वस्तू आढळून आल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या महिन्यात पॅरिसरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण युरोपमध्ये सुरक्षेची खबरदारी घेतली जात आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Dec 2015 रोजी प्रकाशित
संशयास्पद वाहन मिळाल्याने लंडनमध्ये हाय अलर्ट; ‘बीबीसी’चे मुख्यालय रिकामे
ऐतिहासिक लंडन ब्रीज आणि हेझ गॅलरिआ येथील परिसरदेखील सुरक्षेच्या कारणास्तव रिकामा करण्यात आला आहे
Written by रोहित धामणस्कर
First published on: 01-12-2015 at 21:29 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bbc headquarter in central london evacuated following bomb scare