दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-० असा निर्भळ विजय मिळवल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) टीम इंडियाला दोन कोटींचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. बीसीसीआयने मंगळवारी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली. भारताने सोमवारी दिल्ली कसोटीत आफ्रिकेवर ३३७ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला होता. आफ्रिकेच्या फलंदाजांनी हा कसोटी सामना अनिर्णित ठेवण्यासाठी निकराचा संघर्ष केला. मात्र, भारतीय फिरकीपटूंनी त्यांना चकवा देत आफ्रिकेचा दुसरा डाव अवघ्या १४३ धावांत गुंडाळला होता. या विजयासह भारताने कसोटी क्रिकेट क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Dec 2015 रोजी प्रकाशित
भारतीय संघाला बीसीसीआयकडून दोन कोटींचे बक्षिस
भारताने सोमवारी दिल्ली कसोटीत आफ्रिकेवर ३३७ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला होता.

First published on: 08-12-2015 at 17:22 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci to give away rs 2 crore to indian team after 3 0 series win over south africa