Belgian Woman Raped in Pakistan: पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनी (१४ ऑगस्ट) राजधानी इस्लामाबाद येथे एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. पाकिस्तानमध्ये महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटना अनेकदा समोर येत असतात. पण स्वातंत्र्य दिनी एक २८ वर्षीय बेल्जियम देशातील महिला हात-पाय बांधलेल्या अवस्थेत रस्त्यावर आढळल्यामुळे खळबळ उडाली. या महिलेवर पाच दिवस बलात्कार झाला आणि या गुन्ह्यात पोलिसांनी एका स्थानिक नागरिकाला ताब्यात घेतले आहे.

समा टीव्हीने दिलेल्या बातमीनुसार या महिलेचे हात-पाय बांधलेल्या अवस्थेत तिला रस्त्यावर फेकण्यात आले होते. स्थानिकांनी पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी महिलेची सुटका केली. आपल्यावर पाच दिवस अनेक पुरुषांनी लैंगिक अत्याचार केले, अशी तक्रार महिलेने पोलिसांकडे केली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तमीजुद्दीन या स्थानिक आरोपीला अटक केली. तसेच महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हे वाचा >> Kolkata Rape Case : बॅरिकेट्स तोडले, खुर्च्या फोडल्या, जबरदस्तीने रुग्णालयात घुसण्याचा प्रयत्न; कोलकात्यातील रुग्णालयात मध्यरात्री जमावाचा धुडगूस!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने आरोपी तमीजुद्दीनने अत्याचार केल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे त्याची कसून चौकशी केली जात आहे. तमीजुद्दीनची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान तमीजुद्दीनने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सदर पीडित महिला मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचा दावा त्याने केला आहे. तसेच सदर महिलेकडे कोणतेही ओळखपत्र नाही, तिने योग्य कागदपत्रांशिवाय पाकिस्तानात प्रवेश केला आहे, असाही दावा आरोमी तमीजुद्दीनने केला. यानंतर पोलिसांनी तमीजुद्दीनच्या निवासस्थानाची कसून तपासणी केली. या प्रकरणी आता पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.