बिहमरामध्ये नव्याने स्थापन झालेल्या महागठबंधन करकारचा आज (१६ ऑगस्ट) मंत्रीमंडळ विस्तार झाला असून एकूण ३१ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. जदयू पक्षाचे सर्वेसर्वा असलेले नितीशकुमार या सरकारचे नेतृत्व करत असून उपमुख्यमंत्रीपद राजद पक्षाचे तेजस्वी यादव यांच्याकडे देण्यात आलेले आहे.या सरकारमध्ये सर्वाधिक १६ मंत्रीपदं राजद पक्षाला मिळाली आहेत. नितीश कुमार यांच्या पक्षाच्या वाट्याला ११ मंत्रीपदं आली आहेत. काँग्रेस पक्षाला २ तर हिंदुस्तानी आवाम मोर्चा आणि एका अपक्ष आमदाराला प्रत्येकी १ मंत्रीपद देण्यात आले आहे.

हेही वाचा >> भारत-पाक फाळणीच्या भीषण आठवणींचा शालेय पाठ्यपुस्तकात समावेश करा, भाजपा खासदाराची पंतप्रधान मोदींकडे मागणी

या मंत्रीमंडळ विस्तारात मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या पक्षाला राजदच्या तुलानेत कमी मंत्रीपदं मिळाली असली तरी सर्व महत्त्वाची खाती नितीशकुमार यांनी स्वत:कडे ठेवून घेतली आहेत. त्यांच्याकडे गृहखातं असणार आहे. गृहखात्यासोबतच सामान्य प्रशासन, कॅबिनेट सचिवालय या खात्यांचा कारभारदेखील त्यांच्याकडेच असणार आहे. तसेच जी खाती कोणत्याही मंत्र्यांना देण्यात आलेली नाहीत, ती सर्व खातीदेखील नितीशकुमार सांभाळतील.

हेही वाचा >> बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरण : जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या ११ दोषींची सुटका

जदयू पक्षातून मंत्रीमंडळात कायम ठेवण्यात आलेले नेते

जदयूने मोहम्मद जमा खान, जयंत राज, शीला कुमारी, सुनील कुमार, संजय झा, मदन साहनी, श्रवण कुमार, अशोक चौधरी, लेशी सिंह, विजय कुमार चौधरी आणि बिजेंद्र यादव यांच्यासह आपल्या बहुतेक मंत्र्यांना कायम ठेवले.

हेही वाचा >> राजस्थान : दलित विद्यार्थ्याच्या हत्येमुळे राजकीय वातावरण तापले; गेहलोत यांच्यासाठी दलित अत्याचाराचा मुद्दा अडचणीचा ठरणार?

तर आरजेडी पक्षाकडून तेजप्रताप यादव, आलोक मेहता, सुरेंद्र प्रसाद यादव आणि रामानंद यादव, कुमार सर्वजित, ललित यादव, समीर कुमार महासेठ, चंद्रशेखर, जितेंद्र कुमार राय, अनिता देवी आणि सुधाकर सिंग, इस्रायल मन्सुरी, सुरेंद्र राम, कार्तिकेय सिंग, शाहनवाज आलम. , शमीम अहमद या नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. काँग्रेस पक्षाकडून अफाक आलम आणि मुरारी लाल गौतम या दोन नेत्यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले आहे.