YouTuber slaps Railway Passenger for Reel get arrested : सध्या इंटरनेटच्या जगात झटपट प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीही करताना दिसतात. बिहारच्या अनुग्रह नारायन रोड रेल्वे स्थानकावर अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे. ज्यामध्ये एकाने रेल्वेने प्रवास करणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीला विनाकारण कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
प्लॅटफॉर्मवरून रेल्वे जात असताना एक व्यक्ती खिडकीत बसलेल्या एका प्रवाशाला कानशिलात लगावताना दिसत आहे तर त्याचा मित्र दूर उभा राहून हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करत आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आणि याबद्दल अनेकांनी संताप व्यक्त केला.
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी देखील तात्काळ या प्रकाराची दखल घेतली आहे. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF)ने त्यांच्या एक्सवरील अधिकृत खात्यावरून या घटनेमागील आरोपी रितेश कुमार याला अटक केल्याची माहिती दिली आहे. तसेच त्याला माफी मागतानाचा व्हिडीओ पोस्ट करण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान माफी मागणाऱ्या व्हिडीओमध्ये आरोपीने मान्य केले की असे कृत्य करण्यामागे त्याचा हेतू हा फक्त सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवणे हाच होता. “मी एक यूट्यूबर आहे. माझे फॉलोअर्स वाढवण्यासाठी मी व्हिडीओ बनवून इंस्टाग्रामवर पोस्ट करतो. मी अनुग्रह नारायण रोड रेल्वे स्टेशनवर आलो आणि माझ्या फॉलोअर्सची संख्या वाढवण्यासाठी चालत्या ट्रेनमधील एका प्रवाशाला चापट मारली. ही माझी चूक होती आणि मी ती पुन्हा करणार नाही. कृपया मला माफ करा,” असे तो म्हणाला.
No compromise on passenger security !!
A YouTuber who slapped a passenger on a moving train for social media fame has been tracked & arrested by #RPF Dehri-on-Sone! pic.twitter.com/4KckhrCyPy
Your safety matters to us—reckless acts will not be tolerated.#PassengerSafety #RPFAction… pic.twitter.com/2h00IQPTKjThis quiz is AI-generated and for edutainment purposes only.— RPF INDIA (@RPF_INDIA) February 27, 2025
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काय आहे?
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सुरुवात कुमारचा मित्र चालत्या ट्रेनकडे येताना दिसतो आणि रेल्वेत बसलेल्या एका प्रवाशाला सहज चापट मारतो. यानंतर हे दोघे काहीच झाले नाही असे हसू लागतात. मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. अनेकांनी यांच्यावर कारवाई केली जावी अशी मागणी देखील केली.