एका सरकारी कार्यक्रमात तक्रार करणाऱ्या एका सामान्य महिलेला भाजपाच्या मंत्र्यानं रागाच्या भरात कानशिलात लगावल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे मंत्र्यानं कानशिलात लगावल्यानंतरही या महिलेनं संबंधित मंत्र्याच्या पाया पडल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांवर सत्तेच्या मस्तीत अरेरावी केली जात असल्याची टीका आता विरोधकांकडून केली जात आहे.

नेमकं घडलं काय?

हा सगळा प्रकार शनिवारी कर्नाटकच्या चामराजनगर जिल्ह्यातील हांगला गावात घडला. कर्नाटकचे पायाभूत सुविधा विकास मंत्री व्ही. सोमण्णा हे एका शासकीय कार्यक्रमासाठी या गावात उपस्थित होते. सरकारकडून ग्रामस्थांना जमीन हक्कपत्र प्रदान करण्याचा हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात हक्कपत्र वाटप सुरू असताना अचानक एक महिला आपल्याला हक्कपत्र न मिळाल्याची तक्रार घेऊन समोर आली. या महिलेच्या वर्तनामुळे संतप्त झालेल्या मंत्रीमहोदयांनी थेट तिच्या कानशिलातच लगावली.

Action taken by Tihar administration after Delhi Chief Minister Arvind Kejriwal  blood sugar rises
केजरीवालांना इन्सुलिन; रक्तातील साखर वाढल्यानंतर तिहार प्रशासनाकडून कार्यवाही
kerala politics rahul gandhi
“राहुल गांधींचा ‘डीएनए’ तपासायला हवा, ते गांधी असण्याबद्दल संशय”, केरळमधील नेत्याची टीका
AAP's Latest Protest Against Arvind Kejriwal Arrest
केजरीवालांच्या अटकेच्या निषेधार्थ उपोषण
arvind kejriwal
‘आप’चे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न; केजरीवाल यांच्या सुटकेच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान वकिलाचा दावा

केरळमधील CPM नेत्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप, सोने तस्करी प्रकरणातील आरोपी स्वप्ना सुरेश पुन्हा चर्चेत!

काय आहे व्हिडीओमध्ये?

अवघ्या काही सेकंदांचा हा व्हिडीओ असून यामध्ये स्टेजवर मंत्री व्ही. सोमण्णा दिसत आहेत. एकीकडे कार्यक्रम सुरू असताना दुसरीकडे ही महिला अधिकाऱ्यांकडे तक्रार करत असल्याचं दिसत आहे. अधिकाऱ्यंनी न जुमानल्यामुळे ही महिला थेट मंत्रीमहोदयांकडे तक्रार करु लागली. मात्र, यामुळे संतप्त झालेल्या मंत्र्यांनी थेट महिलेच्या कानशिलात लगावल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. पण यामुळे अधिक जोरात प्रतिकार करण्याऐवजी ही महिला चक्क मंत्री सोमण्णा यांच्या पाया पडल्याचंही व्हिडीओमध्ये दिसत आहे.

सोमण्णांनी मागितली माफी!

दरम्यान, हा सगळा प्रकार घडल्यानंतर मंत्री सोमण्णा यांनी सदर महिलेची माफी मागितल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, भाजपाच्या नेतेमंडळींकडून अशा प्रकारची अरेरावी वाढल्याची टीका केली जात आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कर्नाटकचे तत्कालीन कायदामंत्री जे. सी. मधुस्वामी यांचाही अशाच प्रकारचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.