‘इसिस’ या दहशतवादी संघटनेशी ‘बोको हराम’ या नायजेरियातील संघटनेने युती केली असून त्याबाबतचा ध्वनिसंदेश ऑनलाईन जारी करण्यात आला. दरम्यान, ईशान्य नायजेरियात बोको हरामच्या कारवाया सुरू असून तेथे तीन बॉम्बस्फोटात ५८ जण ठार झाले आहेत.
इसिसचा नेता अबू बकर अल बगदादी याचा उल्लेख करून बोको हरामचा नेता अबू बकर शेकाऊ याने सांगितले की, आम्ही मुस्लीम खलीफ अब्न अवाद इब्न इब्राहिम अल हुसैनी अल कुरेशी यांच्याशी हातमिळवणी करीत आहोत. आठ मिनिटांच्या ध्वनी फितीत शेकाऊ कुठेच दिसत नाही. ट्विटर खात्यावर बोको हरामने ही ध्वनिफीत टाकली असून त्यात इंग्रजी, फ्रेंच व अरेबिक भाषेत त्याचा संदेश रूपांतरितही केला आहे.
शेकाऊ याने यापूर्वीही व्हिडिओ संदेशात अल बगदादी याचे नाव घेतले होते, पण त्यांच्याशी युती करण्याचे तो बोलला नव्हता. नायजेरियन अतिरेक्यांनी आतापर्यंत १३ हजार बळी घेतले असून १५ लाख लोकांना बेघर केले आहे. शेकाऊ याने गेल्या वर्षी बोरनो राज्यातील ग्वोझा शहर ताब्यात घेऊन तो खिलाफतीचा भाग असल्याचे जाहीर केले होते, पण अलिकडे बोको हराम संघटना इसिसच्या मार्गाने दहशतवादी प्रचार करीत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Mar 2015 रोजी प्रकाशित
‘बोको हराम’ची इसिसला साथ
‘इसिस’ या दहशतवादी संघटनेशी ‘बोको हराम’ या नायजेरियातील संघटनेने युती केली असून त्याबाबतचा ध्वनिसंदेश ऑनलाईन जारी करण्यात आला.
First published on: 11-03-2015 at 03:59 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boko haram gains new power by aligning with isis