ऑस्कर पुरस्कारामध्ये ‘द एलिफन्ट मॅन’ आणि ‘मिडनाइट एक्स्प्रेस’ चित्रपटातील सहकलाकाराच्या भूमिकेकरिता नामांकन मिळालेले ज्येष्ट ब्रिटीश अभिनेते सर जॉन हर्ट यांचे निधन झाले आहे. स्वादुपिंडाच्या कर्करोगाला बरीच वर्ष लढा देणा-या या अभिनेत्याने वयाच्या ७७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

harry-potter-ollivander-john-hurt

जॉन हर्ट यांनी गेली सहा दशके टेलिव्हिजनवर काम केले. तसेच, त्यांनी २०० पेक्षाही जास्त चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. २०१५ मध्ये हर्ट यांना स्वादुपिंडाचा कर्करोग असल्याचे कळले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचारही सुरु करण्यात आलेले. ‘हॅरी पॉटर’ चित्रपटातील ‘मि. ऑलिव्हॅन्डर’च्या भूमिकेकरिता हर्ट प्रसिद्ध होते. तसेच, त्यांनी ‘हेलबॉय’ आणि ‘डॉक्टर व्हू’ यामध्येही भूमिका साकारल्या होत्या. २०१५ साली ऑगस्ट महिन्यात रेडिओ टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत हर्ट म्हणालेले की, मी मृत्यूला घाबरतो असे म्हणत नाही. पण, या वयात मी याचा जराही विचार करणार नाही असे होऊ शकत नाही. आपण सगळेच जण वेळेसोबत जात असतो. पण, माझे उपचार खूपच चांगल्या पद्धतीने सुरु आहेत. त्यामुळे मी आशावादी झालो आहे.