जम्मू-काश्मीरला लागू असलेले घटनेचे कलम ३७० हटवण्याची शिफारस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडल्यानंतर, बहुजन समाज पार्टीने देखील याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यसभेत बसपाचे नेते सतीशचंद्र मिश्रा यांनी जम्मू- काश्मीरच्या मुद्यावर केंद्र सरकारला बसपा पाठींबा देणार असल्याचे जाहीर केले. सतीश मिश्रा यांनी सांगितले की, आमचा पक्ष सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करतो व आमची अशी इच्छा आहे की, हे विधेयक लवकरात लवकर मंजूर होऊन याचे कायद्यात रूपांतर व्हावे.

या अगोदर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी राज्यसभेत जम्मू-काश्मीरला लागू असलेले घटनेचे कलम ३७० हटवण्याची शिफारस मांडली. यामुळे जम्मू काश्मीरमध्ये मंत्रिमंडळ असेल परंतु या कायद्याला केंद्रशासित राज्याचा दर्जा असेल. तर लडाख हा मंत्रिमंडळ नसलेला केंद्रशासित प्रदेश असेल असा प्रस्ताव अमित शाह यांनी राज्यसभेत मांडला. अमित शहा यांनी