Budget 2023 Date : संसदेच्या अर्थसंक्लपीय अधिवेशनाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. ३१ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेश सुरू होणार आहे, तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प संसदेसमोर मांडणार आहेत.

केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्वीद्वारे ही माहिती जाहीर केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात ६६ दिवसांमध्ये एकूण २७ बैठका होतील. तर १४ फेब्रुवारी ते १२ मार्च पर्यंत अवकाश घेतला जाणार आहे. १२ मार्चपासून संसदेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. सत्राची सुरुवात लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त सत्राद्वारे होईल. या दरम्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन्ही सभागृहांना संबोंधित करतील. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये त्यांचे हे पहिलेच संबोधन असणार आहे.

Budget 2023: नोकरदारांना अर्थसंकल्पातून काय मिळणार? करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढणार?

प्रल्हाद जोशी यांनी ट्वीटमध्ये सांगितले की, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होईल आणि सर्वसाधारण सुट्टीसह ६ एप्रिलपर्यंत चालेल. या ६६ दिवसांमध्ये २७ बैठका बैठका होतील. अमृतकाळात राष्ट्रपतींचे अभिभाषण, केंद्रीय अर्थसंकल्प आणि अन्य मुद्द्यांवरील आभार प्रस्तावावर चर्चा.

Budget 2023: अर्थसंकल्प कसा तयार केला जातो? कोण सादर करते? जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्यावर्षीप्रमाणे २०२३ – २०२४ चा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमन १ फेब्रुवारीला सादर करतील. २०२३ – २०२४ चा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचा हा सलग पाचवा केंद्रीय अर्थसंकल्प असेल. अर्थसंकल्प सादर करण्यात येण्याच्या एक दिवस आधी ३१ जानेवारीला निर्मला सीतारमन आर्थिक सर्वेक्षण सादर करतील.