कॅम्पाकोलातील अनधिकृत घरांच्या बाबतीत तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा कॅम्पाकोला रहिवाशांना आणि पालिकेला चार आठवड्यांची मुदत वाढ दिली आहे.
न्यायालयाने कॅम्पाकोलातील अनधिकृत बांधकामांबद्दल २१ जानेवारी रोजी कॅम्पाकोला रहिवाशी आणि पालिकेने तोडगा काढून तो न्यायालयासमोर सादर करावा यासाठी दोन आठवड्यांनी मुदत दिली होती. परंतु, तोडगा काढण्यास दोन्ही बाजू अपयशी ठरल्या. त्यानंतर आज (सोमवार) सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा चार आठवड्यांची मुदत देत. लवकरात लवकर यावर तोडगा काढावा असा निवाडा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने याआधीच कॅम्पाकोलातील अनधिकृत घरांतील रहिवाशांना येत्या ३१ मे पर्यंतची घर रिकामी करण्याची नोटीस दिली आहे. सर्वोच्च न्यायालायाच्या म्हणण्यानुसार, कॅम्पाकोला रहिवाशांना आणि पालिकेला ३१ मे पूर्वी या अनधिकृत घरांबाबत तोडगा काढण्यास अपयश आले, तर रहिवाशांनी आपली घरे रिकामी करावी लागतील आणि पालिकेला कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार असेल. असे म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Feb 2014 रोजी प्रकाशित
कॅम्पाकोला रहिवाशांना सर्वोच्च न्यायालयाकडून चार आठवड्यांची मुदत
कॅम्पाकोलातील अनधिकृत घरांच्या बाबतीत तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा कॅम्पाकोला रहिवाशांना आणि पालिकेला चार आठवड्यांची मुदत वाढ दिली आहे.
First published on: 03-02-2014 at 03:07 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Campa cola housing row sc gives four week time to residents bmc to resolve issue