दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. दिल्ली सरकारने मद्य विक्री धोरणात घेतलेल्या निर्णयात घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आधीच दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता केजरीवाल यांनाही समन्स बजावले आहे. त्यामुळे आता दिल्लीतल्या राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. अरविंद केजरीवाल यांची १६ एप्रिलला चौकशी केली जाणार आहे. पीटीआयने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

सीबीआय समन्स आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी ट्वीट करून टीका केली आहे. अत्याचाराचा अंत नक्कीच होणार असल्याचं ट्वीट करत भाजपावर टीका केली आहे. मद्य विक्री धोरण प्रकरणी २६ फेब्रुवारीला मनिष सिसोदियांना अटक झाली आहे. त्यानंतर आप आणि भाजपा यांच्यात आरोपांच्या फैरी झडत आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?

२०२०-२१ मध्ये दिल्लीतल्या मद्य धोरणात दिल्ली सरकारने बदल केला होता. काही ठराविक कंत्राटदारांनाच त्यात फायदा मिळवून दिल्याचा आरोप आहे. संबंधित योग्य त्या विभागाच्या संमती न घेताच लायसन्स फीमध्ये सवलत दिल्याचाही आरोप आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक देणारे निर्णय पक्षपातीपणे घेतल्याचा आरोप केजरीवाल यांच्यावर आहे. या मद्य विक्री धोरणातील घोटाळ्याचा आरोप करत मनिष सिसोदियांना अटक करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून जन्म घेतलेला पक्ष अशी आम आदमी पक्षाची ओळख आहे. पण गेल्या काही काळांमध्ये आमदार ते मंत्री असे अनेक लोक वेगवेगळ्या आरोपांखाली अटक झाले आहेत. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन हे मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली जेलमध्ये आहेत. याआधी सोमनाथ भारती यांच्यावरही घरगुती हिंसाचाराचे आरोप होते. मनीष सिसोदिया हे अटक झालेले आपचे पाचवे मंत्री होते.