बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली आहे. सोमवारी नितीशकुमार बिहारमधील औरंगाबाद येथे एका उद्घाटनाच्या कार्यक्रमाला गेले होते. उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर परत जाताना जमावाने तुटलेल्या खुर्चीच्या तुकड्याने त्यांच्यावर हल्ला केला. पण सुदैवाने नितीशकुमार यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. या गंभीर प्रकारानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला.

मुख्यमंत्री नितीशकुमार ‘समाधान यात्रे’च्या निमित्ताने औरंगाबादच्या कांचनपूर येथे गेले होते. मुख्यमंत्री नितीशकुमार येथे पंचायत भवनाचे उद्घाटन करणार होते. उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांबरोबर परत जायला सुरुवात केली.

हेही वाचा- ‘अजितदादा बोलले तर मी आणखी गौप्यस्फोट करेन’, पहाटेच्या शपथविधीवरुन फडणवीसांचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी जमावांनी घटनास्थळी गर्दी केली होती. ते आपल्या मागण्या घेऊन त्याठिकाणी आले होते. पण सुरक्षा रक्षकांमुळे त्यांना मुख्यमंत्र्यांशी बोलता येत नव्हतं. यामुळे संतप्त जमावाने मोडलेल्या खुर्चीचा काही भाग मुख्यमंत्र्यांच्या दिशेने फेकला. सुरक्षा कर्मचारी आसपास असतानाच हा प्रकार घडला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मात्र, हा प्रकार नेमका कुणी केला? हे अद्याप कळू शकलं नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.