Dawood Ibrahim Death Rumours : आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमवर विष प्रयोग करण्यात आल्याबद्दल समाज माध्यमांवर चर्चेला उत आला होता. पाकिस्तानमध्ये अफवा पसरल्यानंतर जगभरात ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली. परंतु, दाऊद इब्राहिम १००० टक्के तंदुरुस्त असल्याची माहिती त्याचा हस्तक छोटा शकील याने दिली. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

दाऊदच्या मृत्यूबाबत अनेक वेळा खोट्या बातम्या पेरण्यात आल्या आहेत. पाकिस्तानातील समाज माध्यमांवरील वाहिन्यांनी दाऊद इब्राहिम रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती दिल्यामुळे दिवसभर याविषयी चर्चा सुरू होती. पाकिस्तानात दाऊद इब्राहिमवर विष प्रयोग करण्यात आला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती त्यात देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली. परंतु, याबाबत छोटा शकीलने मोठा खुलासा केला आहे. “भाईच्या मृत्यूची बातमी निराधार आहे. तो १००० टक्के तंदुरुस्त आहे. खोडकर हेतुने कोणीतरी ही अफवा पसरवली”, असं छोटा शकीलने टाईम्स ऑफ इंडिया सांगितले. छोटा शकील सध्या डी कंपनीचं कामकाज पाहतो. डी कंपनीची स्थापना दाऊदने केली होती. शकील जेव्हा पाकिस्तानात गेला होता तेव्हा दाऊद एकदम सुस्थितीत होता. दाऊदला विषबाधा झाल्याचं वृत्त गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनीही फेटाळलं. दाऊदला चोवीस तास सुरक्षा रक्षकांचा पहारा असतो.

Dr Dharmesh Patel California accident
स्वतःच्या कुटुंबालाच मृत्यूच्या दरीत ढकल्यानंतर भारतीय व्यक्तीला अटक, सुनावणी सुरू असताना समोर आली धक्कादायक माहिती
Itishree thinking about What do I really want is very important in relationship
इतिश्री : ‘मला नेमकं हवंय काय?’
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?

मुंबई पोलिसांनी काय सांगितलं?

दाऊदवर विषय प्रयोग झाल्याच्या वृत्तानंतर भारतातील विविध यंत्रणा या प्रकरणाची पडताळणी करण्यात व्यस्त होते. मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेसह गुन्हे शाखनेही दाऊदवरील विष प्रयोग व रुग्णालयात दाखल केल्याच्या वृत्ताची पडताळणी केली. त्यात दाऊद टोळीशी संबंधित, तसेच दाऊद कुटुंबियांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींकडून माहिती घेण्यात आली. त्यानंतर दाऊदवरील विष प्रयोगाचे वृत्त चुकीचे असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. प्रकृती ठिक नसल्यामुळे दाऊद वैद्यकीय तपासणीसाठी गेल्या आठवड्यात पाकिस्तानातील एका रुग्णालयात गेला होता. पण सध्या तो पाकिसानातील घरी असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. 

करोनाकाळातही मृत्यूची अफवा

दोन वर्षांपूर्वीही दाऊदला करोना झाला असून त्यात त्याचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. दाऊदच्या मृत्यूबाबतही अनेक वेळा अशा अफवा पसरल्या होत्या. दाऊदच्या हालचालींवर भारतीय यंत्रणा नियमित लक्ष ठेऊन असतात. वयस्कर झालेला दाऊद मधुमेहसह इतर आजारांनी त्रस्त आहे. त्यामुळे नियमित तपासणीसाठी त्याला रुग्णालयात जावे लागत असल्याचेही सूत्रांनी सांगितले. दाऊदचे पाकिस्तानातील राहण्याचे ठिकाणही बदलण्यात आल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. दाऊद इब्राहिमचा पुतण्या आणि हसिना पारकरचा मुलगा अली शाह याने राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) चौकशीत दाऊदच्या नवीन घराबाबतची माहिती दिली होती.

आता दाऊद राहतो कुठे?

दाऊद सध्या कराचीत अब्दुला गाजीबाबा दर्ग्याच्या मागच्या बाजूला असलेल्या रहीम फाकी परिसरातील संरक्षण खात्याच्या ताब्यातील जागेत राहत आहे. एवढी वर्ष दाऊद डी १३, ब्लॉक-४, कराची डेव्हलपमेंट अथॉरिटी, स्कीम-५, क्लिफ्टन कराची येथे राहत होता. पण सुरक्षेच्या दृष्टीने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांनी त्याचे घर बदलल्याचे बोलले जात आहे.