नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यात तवांग क्षेत्रात यांगत्से येथे गेल्या आठवड्यात चकमक झाली. हा प्रकार अरुणाचल प्रदेशात घडला असून स्थानिक कमांडर पातळीवर वाद मिटवण्यात आला, असे सूत्रांनी सांगितले.  चीनचे गस्ती पथक भारतीय प्रदेशात घुसले असता त्यांच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांना माघारी पिटाळण्यात आले. पूर्व ल़डाख प्रश्नावर दोन्ही देशात कोअर कमांडर पातळीवर पुढील तीन चार दिवसात चर्चा होण्याची शक्यता आहे.