गुजरातमध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पुन्हा एकदा मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय जनता पक्षाने यश मिळवले. लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या चार जागांवर भाजपचेच उमेदवार निवडून आले आहेत.
पोरबंदर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे विठ्ठल रदादिया तर बानसकंठा मतदारसंघातून हरिभाई चौधरी विजयी झाले. या दोघांनीही कॉंग्रेसच्या उमेदवारांचा निवडणुकीत धुव्वा उडवला. जेतपूर, लिंबाडी, धोराजी आणि मोरवा हादफ विधानसभा मतदारासंघातूनही भाजपचेच उमेदवार विजयी झाले आहेत.
एकूण १८२ जागा असलेल्या गुजरात विधानसभेमध्ये आता भाजपचे ११५ सदस्य आहेत. कॉंग्रेसचे ५७, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे २ आणि गुजरात परिवर्तन पक्षाचे दोन आमदार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 5th Jun 2013 रोजी प्रकाशित
गुजरात मोदींचाच; पोटनिवडणुकीत भाजपची सरशी
गुजरातमध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पुन्हा एकदा मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय जनता पक्षाने यश मिळवले.
First published on: 05-06-2013 at 01:52 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clean sweep for narendra modi in gujarat bypolls