scorecardresearch

‘कॉमन क्रेन’च्या तस्करीचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत

वाघांची शिकार आणि तस्करीचा धोका टळलेला नसतानाच आता वन्यजीव संरक्षण कायदा १९७२च्या अधिसूची एकमधील ‘कॉमन क्रेन’ या पक्ष्याच्या तस्करीचे प्रकरण समोर आले आहे.

crain
‘कॉमन क्रेन’च्या तस्करीचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

नागपूर : वाघांची शिकार आणि तस्करीचा धोका टळलेला नसतानाच आता वन्यजीव संरक्षण कायदा १९७२च्या अधिसूची एकमधील ‘कॉमन क्रेन’ या पक्ष्याच्या तस्करीचे प्रकरण समोर आले आहे. पश्चिम बंगाल ते मुंबई या मार्गाने होणाऱ्या या तस्करीचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील धागेदोरे उघड झाले तरी या प्रकरणातील आरोपींना सशर्त जामीन मिळाल्याने तपासयंत्रणेच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

गोंदिया जिल्ह्यातील कोहमारा आणि देवरीदरम्यान पाच ते सहा दिवसांपूर्वी पश्चिम बंगालवरून पाच ‘कॉमन क्रेन’ मुंबईला नेत असताना आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींना १६ सप्टेंबपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली.

amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…
bachchu kadu on pankaja munde
“…म्हणून पंकजा मुंडेंवर कारवाई झाली असावी”, बच्चू कडूंचं थेट विधान
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’

हेही वाचा >>>पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत मांडलं महिला आरक्षण विधेयक; म्हणाले, “ईश्वराने मला…”

सर्व आरोपी आणि त्यांची वाहने गुजरातमधील होती. यापूर्वीही दोनदा ‘कॉमन क्रेन’ची तस्करी करण्यात आली असून अटकेतील एका आरोपीचा यात सहभाग होता. त्यांच्याकडे बनावट वाहतूक परवाना, प्रस्ताव व संगणकावर तयार करण्यात आलेली बनावट कागदपत्रे सापडली. तसेच सौदी अरेबियातील हॉटेल्सचे ‘व्हिजिटिंग कार्ड’ मिळाले. त्यामुळे ही तस्करी आंतरराष्ट्रीय स्तरावर असल्याचे त्याचवेळी स्पष्ट झाले. त्यामुळे या प्रकरणाचा तपासही वाघांच्या तस्करीप्रमाणेच करणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही.

तस्करीतून सुटका केलेल्या पक्ष्यांना ‘गोरेवाडा बचाव केंद्रा’त आणले आहे. त्यापैकी एकाचा अतिसारामुळे मृत्यू झाला. आणखी दोघांनाही त्याची लागण झाली आहे.

अधिसूची एकमधील पक्ष्यांच्या तस्करीचे प्रकरण असताना तपासही त्याच दर्जाचा हवा होता. मात्र, आरोपींना अटी व शर्तींवर जामीन मिळाल्याने तपासयंत्रणेतील त्रुटी समोर आल्या. – सावन बाहेकर, मानद वन्यजीव रक्षक, गोंदिया.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-09-2023 at 03:17 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×