पीटीआय, नवी दिल्ली
उत्तर प्रदेशातील कानपूर येथे दोन मुलींवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी भाजप सरकारवर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनी हल्लाबोल केला. उत्तर प्रदेशात कायदा नावाची गोष्टच उरली नसून, येथे ‘जंगल राज’ आहे. पीडित मुली आणि महिलांनी न्यायासाठी दाद मागितल्यास त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा नियमच बनल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
प्रियंका यांनी ‘एक्स’वर पोस्ट केली, की कानपूरमध्ये सामूहिक बलात्कारप्रकरणी दोन पीडित अल्पवयीन मुलींनी आत्महत्या केली आहे. आता त्या मुलींच्या वडिलांनीही आत्महत्या केली आहे. आता हे प्रकरण दाबून टाकण्यासाठी या पीडित कुटुंबावर तडजोड करण्यासाठी सातत्याने दबाव आणला जात असल्याचा आरोप आहे.